आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Action In Accordance With The Provisions Of The Act, 'FDA' Claim

कायद्यातील तरतुदीनुसारच कारवाई, ‘एफडीए’चा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- चांदवड येथील गणेश मेडिकलचे जितेंद्र डुंगरवाल यांचे दुकान बंद असताना त्यांच्या कुटुंबीयांना जबरदस्तीने दुकान उघडायला लावून कारवाई करण्यात आली. डुंगरवाल हे संघटनेचे पदाधिकारी असल्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मयूर अलई यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, संघटनेचे आरोप बिनबुडाचे असून, केवळ डुंगरवालच नव्हे, तर आणखी दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या दोन्ही ठिकाणचे फार्मासिस्ट पूर्णवेळ प्राध्यापकाची नोकरी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानेच गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

‘एफडीए’ची कारवाई योग्यच : उरणकर
चांदवड येथील गणेश मेडिकल (सोमवार पेठ) व संजस्वी मेडिकल (घोडकेनगर) या दोन दुकानांच्या तपासणीत गणेश मेडिकलचे संचालक जितेंद्र डुंगरवाल यांनी पूर्णवेळ फार्मासिस्ट उर्मिला नीलेश डुंगरवाल यांची, तर संजस्वी मेडिकलचे संचालक म्हणून अमोल पुंडलीक ठाकरे यांची नोंद केल्याचे आढळले. दरम्यान, उर्मिला या 1 डिसेंबर 2011 पासून चांदवडच्याच एसएनजेबी फार्मसी कॉलेजला, तर अमोल ठाकरे हे 30 जून 2012 पासून पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून विवेकानंद संस्थेच्या महाविद्यालयात मुंगसे (ता. मालेगाव) येथे कार्यरत असल्याचे दिसून आले. यावरून डुंगरवाल आणि ठाकरे यांनी प्रमाणपत्राचा दुहेरी लाभ घेत रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार आढळला. या प्रकरणी डुंगरवाल यांच्यासह त्यांना मदत करणार्‍या जितेंद्र डुंगरवाल व अमोल ठाकरे यांच्याविरुद्ध चांदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, कुठल्याही सूडबुद्धीने कारवाई केली नसल्याचा दावा सहआयुक्त जयंत उरणकर यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

अधिकार्‍यांच्या पथकावरून संशय

एरवी एखादे निरीक्षक तपासणी करून कारवाई करतात. मात्र, डुंगरवाल यांच्यावरील कारवाईसाठी सहायक आयुक्तांसह निरीक्षकांपर्यंत चार-चार अधिकारी येतात, यावरूनच त्यांनी नियोजनबद्ध आणि सूडबुद्धीने कारवाई केल्याचा संशयही पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.