आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आरटीओ’चा धडाका, मध्यरात्री कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आरटीओ विभागाच्या वायुवेग पथकाकडून महामार्गावर मध्यरात्री धडक कारवाई सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. आरटीओ अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याकडून ही धडक कारवाई सुरू असते, हे विशेष. या कारवाईत मध्यरात्री होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा आहे.
महामार्गावर मध्यरात्री अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. तांत्रिक खराबीमुळे अवजड वाहने रस्त्याच्या कडेला थांबलेले असतात. अशा वाहनांवर पथकाकडून कारवाई केली जाते. वाळूची अवैध वाहतूक सुरू असूनही याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.
अधिकारी आणि चालक यांच्याकडून कारवाईचा धडाका सुरू असतो. तो पहाटेपर्यंत सुरूच असतो. परराज्यातील वाहनांना आरटीओकडून टार्गेट केले जाते. क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक, ट्रॉली बाहेर आलेल्या धोकेदायक लोखंडी सळाईंची नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असलेल्या कारवाईत हजारोंचा महसूल जमा होतो. अशीच धडाकेबाज कारवाई अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर केल्यास प्रादेशिक परिवहन विभागाच्या महसुलात भर पडेल. मात्र, अधिकारी आपलाच महसूल वाढवण्यासाठी ‘मासिक’ तडजोड करत असल्याचे काही वाळू वाहतूकदारांनी सांगितले. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘फिक्स’ नियुक्ती असल्याने बहुतांशी वाळू वाहतूकदारांनी या अधिकाऱ्यांशी संधान बांधले आहे. अधिकाऱ्यांनी कडक कारवाई केल्यास विभागाच्या महसूलमध्ये नक्कीच वाढ होणार असल्याचे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...