आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातील आता केबल कंपन्यांवरच कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- डॅश सिस्टीम लागू होऊन दोन महिने उलटून गेल्यानंतरही एमएसओंनी (मल्टी सिस्टीम ऑपरेटर) कर न भरल्याने, तसेच ग्राहकांकडून सीआरएफ अर्जही भरून न घेतल्याने जिल्हा प्रशासन आता थेट केबल कंपन्यांवरच कारवाई करणार आहे. ‘डीबी स्टार’ने 8 जूनला प्रसिद्ध केलेल्या ‘सेटटॉप बॉक्सचा ग्राहकांना शॉक’ या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने केबल ऑपरेटरांना ग्राहकांची यादी जाहीर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

केंद्र शासनाने डॅश (डिजिटल अँड्रेसेबल सिस्टीम) प्रणालीमार्फत केबल प्रसारणाचे सिग्नल घेणे बंधनकारक केले. त्यासाठी सेटटॉप बॉक्स बसविणेही अनिवार्य केले. मात्र, एमएसओंनी दर महिन्याचे पॅकेज जाहीर न करता काही चॅनेल्सही बंद केले. शिवाय, जुन्या दरांप्रमाणे ग्राहकांकडून भाडे वसूल करणे सुरूच ठेवले. शिवाय, प्रशासनाला ग्राहकांची यादी सादर करणे तर दूरच, ग्राहकांचे सीआरएफ अर्जही भरून घेतले नाही. त्यामुळे जिल्हा करमणूक कर विभागाने केबल ऑपरेटरांना नोटीस देत त्याअनुषंगाने कार्यवाही न केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

ग्राहकांचा हवा पुढाकार
पूर्वी केबल ऑपरेटरांना बंधनकारक असलेला परवाना एमएसओंना बंधनकारक करण्याच्या पाठवलेल्या प्रस्तावावर अद्याप आदेश आलेले नाहीत. केबल चालक सीआरएफ अर्जाबाबत मागणी करत नसले तरी नागरिकांनी त्वरित ते भरून द्यावेत.
-नीलेश जाधव, उपजिल्हाधिकारी