आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेठ्या अावाजात डीजे वाजविणाऱ्या चाैघांना अटक, नगरसेवक शेलारांचा शाेध सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेशविसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपक अथवा वाद्य वाजविताना उच्च न्यायालयाने ठरवून दिलेली मर्यादा अाेलांडून इतरांनाही माेठ्या अावाजात डाॅल्बी सिस्टिम वाजविण्यासाठी चिथावणी दिल्याप्रकरणी पाेलिसांनी दंडे हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष राहुल ऊर्फ बबलू शेलार याच्यासह चार संशयितांना अटक केली. गुरुवारी (दि. ६) सायंकाळी भद्रकाली पोलिसांनी ही कारवाई केली असून, याच गुन्ह्यातील मुख्य संशयित तथा सार्वजनिक मंडळाचे संस्थापक नगरसेवक गजानन शेलार यांच्या अटकेसाठी पाेलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतल्याचे सांगण्यात अाले. मात्र, ते मिळाल्याने त्यांचा शाेध सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले. 
 
काेर्टाने सण, उत्सव अाणि मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषण राेखण्यासाठी अावाज मर्यादा ठरवून दिलेली अाहे. या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे अादेशही दिले अाहेत. त्या पार्श्वभूमीवर पाेलिस अायुक्तांनी गणेशाेत्सवाच्या सुरुवातीलाच गणेश मंडळांच्या बैठकांमध्ये ध्वनिप्रदूषण राेखण्याचे डीजेसारखे वाद्ये वाजवता पारंपरिक वाद्यांचाच मर्यादित अावाजात वापर करण्याचेही सुचविले हाेते. 

मात्र, न्यायालय अाणि पाेलिस यंत्रणेला उघड उघड अाव्हान देण्याचाच प्रकार दंडे हनुमान मंडळासह शहरातील १० ते १२ गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीत दिसून अाला. याप्रकरणी पाेलिसांनी भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी अाणि उपनगर पाेलिस ठाण्यांत एकूण १० गुन्हे दाखल केले अाहेत. यामध्ये दंडे हनुमान मित्रमंडळाचे संस्थापक नगरसेवक गजानन शेलार यांनी मिरवणुकीत डीजे लावण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यानंा चिथावणी दिल्याची तक्रार करण्यात अाली अाहे. 

या मंडळाचे अध्यक्ष बबलू शांताराम शेलार याच्यासह खजिनदार योगेश मदरेले, उपखजिनदार अक्षद कमोद, डीजेचालक गणेश तोरे यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुरुवारी (दि. ७) उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या पथकाने गजानन शेलार वगळता चार संशयितांना अटक केली. शेलार यांच्या घरीही पोलिसांनी झडती घेतली असून ते मिळून आले नसल्याचे सहायक आयुक्त डॉ. भुजबळ यांनी सांगितले. संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर करून पाेलिस काेठडीची मागणी करणार असल्याचे सांगण्यात अाले. 
 
भद्रकाली अाणि सरकारवाडा पाेलिस ठाण्यात नगरसेवक गजानन शेलार यांच्यासह त्यांचा पुतण्या इतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात अाल्याने त्यांना पाेलिसांकडून तत्काळ अटकेची शक्यता वर्तवली जात हाेती. या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर शेलार हे नियाेजित नाशिक मर्चंट बँकेच्या सर्वसाधारण सभेस अनुपस्थित राहण्याची शक्यता हाेती. मात्र, शेलार यांनी सभेस हजेरी लावत तेथे अाक्रमक भूमिकाही मांडली. तरीही पाेलिसांकडून त्यांचा शाेध सुरू असल्याच्या दाव्याने अाश्चर्य व्यक्त केले जात अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...