आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Action On The 73 Notorious Criminals In Combing Operation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये ७३ सराईत गुन्हेगारांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गेल्या दोन दिवसांमध्ये शहरात विविध ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनसह विविध उपाययोजनांत ७३ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. नाकेबंदीदरम्यान सुमारे दीड हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस आयुक्तांसह सर्व अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत.
शहरात वाढलेली गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दोन दिवसांपासून शहरात कोम्बिंग आणि अचानक नाकेबंदी सुरू करण्यात आली आहे. वाढलेली गुन्हेगारी रोखण्याचे पोलिस दलासमोर मोठे आव्हान होते. वाढत्या गुन्हेगारीने पोलिस आयुक्तांवर राजकीय पक्षांकडून टीकाही झाली होती. चार दिवसांपासून शहराच्या विविध भागात अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे. पंचवटी आणि लेखानगर झोपडपट्टी भागातील कारवाईत ७३ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
हत्यार कायदा कलमाखाली केलेल्या कारवाईत चार देशी बनावटीचे कट्टे, १८ प्राणघातक हत्यारे आणि चोरीच्या दुचाकी संशयितांकडून हस्तगत करण्यात आल्या. कारवाईदरम्यान एक खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.

घरफोडीच्या गुन्ह्यातील सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले. घरझडतीमध्ये २३० ग्रॅम सोने आणि १२० किलो तांब्याच्या पट्ट्या आणि दोन चोरीचे दूरचित्रवाणी संच हस्तगत करण्यात आले. पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन, परिमंडळ चे पोलिस उपआयुक्त विजय पाटील, गुन्हे शाखेच्या उपआयुक्त एन. अंबिका, अविनाश बारगळ, सहायक आयुक्त सचिन गोरे यांच्यासह भद्रकाली, पंचवटी, इंदिरानगर ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी ऑपरेशनमध्ये सहभागी होते.
हत्यार बाळगणारे चौघे जेरबंद : संशयितांच्याघरझडतीमध्ये देशी बनावटीचे कट्टे, १८ प्राणघातक हत्यारे, चाकू जप्त करण्यात आले.
अशी झाली कारवाई
परिमंडळच्या हद्दीत फुलेनगर लेखानगर झोपडपट्टी भागात कोम्बिंग, शहरात वेळा नाकेबंदीत १३९२ केस दाखल करण्यात आल्या. यामध्ये लाख ४२ हजार रुपये दंड करण्यात आला. ७३ रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
मोठ्या व्यावसायिकांना पोलिसांचे अभय
वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिस दलाकडून रात्री १० नंतर सुरू राहणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात येत आहे. कॉलेजरोड परिसरात काही आइस्क्रीमच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या पारिजातनगर, महात्मानगर भागात काही व्यावसायिकांना मात्र पोलिसांकडून अभय देण्यात आला. कारवाईदरम्यान पोलिसांनी दमदाटी केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, पंचवटीत ३० संशयितांवर कारवाई...पंचवटीमध्ये कोम्बिंगदरम्यान खून...