आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२७० बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई, वाहतूक शाखेकडून कारवाईचा धडाका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहराची वाहतूक व्यवस्था खिळखिळी करणाऱ्या २७० बेशिस्त रिक्षाचालकांसह रिक्षामालकांवर वाहतूक शाखेकडून दोन दिवसांत विविध ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

शहरातील रिक्षाचालकांमुळे वाहतूक व्यवस्था बिघडल्याच्या असंख्य निनावी तक्रारी पोलिस आयुक्तांना प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांसह रिक्षामालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशान्वये उपायुक्त विजय पाटील, सहायक आयुक्त प्रशांत वाघुंडे, सहायक निरीक्षक सुरेश भाले, प्रवीण कदम आदींसह कर्मचारी उल्हास गांगुर्डे, धनराज बागुल, नितीन थेटे, योगेश वाडेकर, दीपक नाईक, श्रीधर डोळस यांच्या पथकाने सीबीएस, रविवार कारंजा, शालिमार, नवीन सीबीएस, काठे गल्ली, द्वारका सर्कल या भागात विशेष मोहीम राबवत दोन दिवसांत २७० रिक्षाचालकांवर कारवाई केली. सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांना नेहमीच होणारा त्रास कमी झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

इतरकारवाईचा धडका नवीनसीबीएसच्या दुतर्फा पार्किंगबाबत १२५, नवीन बसस्थानक, द्वारका, मुंबई नाका येथे अनधिकृत उभ्या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३३ खासगी बसचालकांवर, १५० रिक्षामालकांवर कारवाई करण्यात आली. रिक्षा थांब्यांवरील नियमांचे पालन करणाऱ्या रिक्षाचालकांचे प्रबोधन करण्यात आले.
प्रतिबंधक कारवाई
रिक्षाथांब्यांवर इतर रिक्षाचालकांवर दादागिरी करणाऱ्या टवाळखोर रिक्षाचालकांवर पोलिस ठाण्यात प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. ७०० ते हजार रुपये दंड आकारण्यात आला. दंड भरणाऱ्या बहुतांश रिक्षाचालकांना न्यायालयात पाठविण्यात आले.