आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नो पार्किंग नियमांचे उल्लंघन केल्याने 80 वाहनांना ‘जॅमर’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नो पार्किंगमध्ये वाहन उभे करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८० वाहनांना जॅमर लावण्यात आले. त्यांच्याकडून सोळा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. गुरुवारी (दि. २९) महात्मा गांधी रोडवर वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई केली. शहरातील इतर रस्त्यांवर पार्किंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला.

महात्मा गांधी रोडवर पार्किंगची बिकट समस्या आहे. या रस्त्यावर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे. उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अजय देवरे, निरीक्षक नम्रता देसाई यांच्यासह विभाग मधील वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नो पार्किंगची विशेष मोहीम राबवत ८० वाहनांना जॅमर लावण्यात आले. वाहनमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील इतर रस्त्यांवर नो पार्किंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई सुरू राहणार आहे.
 
कारवाई सुरूच राहणार
शहरातील पार्किंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर विशेष मोहिमेंतर्गत कारवाई सुरू आहे. एम.जी. रोडवर कारवाई करण्यात अाली. शहरातील इतर रस्त्यांवर अशाचप्रकारे धडक कारवाई करण्यात येणार आहे.
- लक्ष्मीकांत पाटील, उपआयुक्त
बातम्या आणखी आहेत...