आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याची नासाडी केल्यास आता होणार कारवाई...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेला वॉटर ऑडिटचे वावडे तर इतर शासकीय कार्यालयांत सर्रास सुरू असलेली पाण्याची नासाडी, हे विदारक चित्र आपल्या शहरातील आहे. जुलै महिना उजाडला तरी पावसाने तोंड न दाखविल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून, पाण्याची नासाडी करणा-यांवर कठोर कारवाईचे संकेत मिळू लागले आहेत.

शहरातील सिडको आणि सातपूरच्या काही भागांत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असून, अनेक ठिकाणी तर नळांना तोट्या नाहीत. शासकीय कार्यालयेही पाण्याची नासाडी करण्यात मागे नसल्याचे चित्र दिसून आले आहे. वाचकांनीच आता अशा बेजबाबदार नागरिकांविरुद्ध मोहीम उघडत फोटो काढून ते ‘दिव्य मराठी’कडे पाठविण्यास सुरुवात केली आहे.
असे हवेत जागरूक नागरिक : प्रादेशिक परिवहन कार्यालयात कामानिमित्त गेलेल्या उमेश मेटकर यांना तेथे पाण्याचा अपव्यय होताना दिसून आला. नळाखाली लावलेले टिप भरलेले होते आणि त्यातून पाणी ओसंडून वाहात होते. मेटकर यांनी हे छायाचित्र टिपले आणि ते ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात येऊन दिले.

नळांना तोट्या बसवा
- ज्यांच्याकडे नळांना तोट्या नाहीत आणि त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत असेल त्यांनी तत्काळ तोट्या बसवून घ्याव्या. पाण्याची नासाडी केल्यास कठोर कारवाई करू.
उत्तम दोंदे, सभापती, सिडको प्रभाग
..तर कारवाई करणार
- कालचे पाणी आज शिळे म्हणून फेकू नका. कारण, पाणी कधीच शिळे होत नाही. पाण्याचा सुयोग्य आणि काटकसरीने वापर करा. पाण्याची नासाडी केल्यास कारवाई केली जाईल.
सुरेखा नागरे, सभापती, सातपूर प्रभाग
---------------------