आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर कारवाई हाेणारच - गिरीश महाजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - माजी मंत्री छगन भुजबळांविराेधात करण्यात अालेल्या तक्रारीसंदर्भात २० जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे अादेश न्यायालयाने एसीबीला दिल्यानंतर त्यांच्या विराेधातील कारवाईला वेग प्राप्त झाला आहे. म्हणून राज्यातील भाजप सरकारकडून भुजबळांनाच टार्गेट केलं जातेय, अजित पवार आणि सुनील तटकरेंना अभय दिले जातेय, असे अजिबातच नाही.
ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांच्यावर कारवाई होणारच, असं स्पष्ट करत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी नाशिकदाैऱ्यात भुजबळ, तटकरे आणि अजितदादांवरच चांगलेच ताेंडसुख घेतले.
आमदार छगन भुजबळांवरील कारवाई आकसापोटी केली जात अाहे का? अशी विचारणा वारंवार माध्यमांकडून होतेय. भुजबळ तर म्हणताहेत, हे सारं चुकीचं आहे. मालमत्ता वडिलोपार्जित असून, आताच्या दरांचा विचार करून तिच्या किंमतीचे आकडे फुगवून बदनामी केली जात असल्याचा त्यांचा दावा अाहे. जर खरंच हे सारं चुकीचं असेल, तर होऊद्या की चौकशी, त्यात दोष नसल्यास कारवाई होणार नाही. त्यामुळे तुम्ही त्याबाबत चिंता कशाला करता, असाही खोचक प्रश्नही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे भाजप कार्यालयात बोलताना उपस्थित केला. अजित पवार आणि सुनील तटकरेंना अभय दिले जात आहे. त्यांच्यावरील कारवाईचे काय? असे मला विचारले जातेय. परंतु, ही कारवाई सरकार अजिबातच करत नाही. न्यायालयात दाखल करण्यात अालेल्या जनहित याचिका अाणि त्यातील तक्रारींवरून न्यायालयाच्या आदेशाने सरकारी यंत्रणा केवळ अहवाल, पुरावे, माहिती न्यायालयासमाेर सादर करत आहे.

अजितदादा, तटकरेंवरही कारवाई हाेणारच
अजित पवार आणि तटकरेंच्या चाैकशीसंदर्भात असलेली माहिती पुरावे अैारंगाबादच्या चितळे समितीला आणि सरकारला देण्यात अाल्यानंतर ते न्यायालयात सादर केले जातील. या सर्व तांत्रिक बाबी असल्याने चौकशीसाठी वेळ लागणारचं अाहे. त्यामुळे या दाेघांवरही कारवाई होणारच असल्याचे स्पष्ट संकेत महाजन यांनी दिले.

पक्ष काेणताही असाे, भ्रष्ट नेत्यांना अभय नाही
भाजप अथवा पंतप्रधान मोदींनीही पाहिलेले कॉंग्रेसमुक्त भारताचे स्वप्न अाता पूर्णत्वाकडे जात असून, आता त्याचबराेबर देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठीची ही प्रक्रिया अाहेे. त्यातून भाजप शिवसेनेबराेबरच, कॉंग्रेस, राष्ट्रवादी किंवा मनसे असा कुठल्याही पक्षाच्या भ्रष्ट नेत्याला अभय दिले जाणार नसल्याचेही पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पवारांनाही हाणला टोला
शरद पवारांच्या, ‘केव्हा जेलमध्ये टाकताय याचीच वाट आम्ही पाहतोय’, या वक्तव्याचा गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला. जेलमध्ये दोषींनाच पाठवले जाते. त्यामुळे भुजबळांनी आपले पुरावे न्यायालयात सादर करावेत. न्यायालय त्यावर निर्णय घेईल. आमची त्याला अजिबात हरकत नसल्याचं सांगत शरद पवारांनाही टोला हाणला
बातम्या आणखी आहेत...