आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत हाेर्डिंगविरुध्‍द होणार कारवाई, निनावी तक्रारही वैध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहर २६ जानेवारीपर्यंत हाेर्डिंगमुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे अादेश असल्यामुळे एरवी या मुद्याकडे बेफिकीरपणे पाहणाऱ्या महापालिकेने झपाट्याने हालचाली सुरू केल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून निनावी तक्रारीही वैध ठरवून लाेकांना काेणतेही भय बाळगता तक्रारी करण्याचे अावाहन अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे यांनी केले अाहे. त्यासाठी ‘टाेल फ्री’ क्रमांकही उपलब्ध करून दिले अाहेत.

उच्च न्यायालयात गेल्या वर्षभरापासून अनधिकृत हाेर्डिंगबाबत सुनावणी सुरू अाहे. मुंबई, पुण्याबराेबरच नाशिकमधून याचिका दाखल झाल्या अाहेत. यापूर्वी न्यायालयाने अनधिकृत हाेर्डिंग अाढळल्यास संबंधितांविराेधात फाैजदारी गुन्हे दाखल करण्याचे अादेश दिले अाहेत. त्यानुसार काही दिवस गुन्हे दाखल करण्यात अाले. मात्र, राजकीय दबावाचे कारण देत कालांतराने माेहीम थंडावली. न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब अाणून दिल्यानंतर अाता कठाेर कारवाईचे अादेश दिले अाहेत. त्याचाच एक भाग म्हणून २६ जानेवारीपर्यंत शहरात एकही अनधिकृत हाेर्डिंग दिसणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना अाहेत. त्या अनुषंगाने अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे यांनी विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अनधिकृत हाेर्डिंग राहिले तर न्यायालयाचा अवमान केला म्हणून महापालिकेवर कारवाईची नामुष्की येईल. त्यामुळे महापालिकेच्या अधिकृत असलेल्या ७० ठिकाणांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी लावलेले अनधिकृत हाेर्डिंग काेणाचीही भीडभाड ठेवता काढून घ्यावे, असे अादेश दिले आहेत.

येथे नोंदवाव्यात तक्रारी
महापालिकेच्या१४५ वा ७०३०३०३०० या ‘टाेल फ्री’ क्रमांकांवर तक्रार करण्याचे अावाहनही करण्यात आले असून, तक्रार करणाऱ्यांचे नाव गाेपनीय ठेवले जाईल, असेही स्पष्ट करण्यात अाले.