आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Sai Tamhankar Attended Vision 2015 Program At Nashik

‘व्हिजन २०१५’मध्ये कार्यक्रमांची रेलचेल, अभिनेत्री सई ताह्मणकरची उपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लख्खप्रकाश.. स्पॉट लाईट्स आणि यामध्ये होणारे धम्माल नृत्य.. नुसते एवढेच नाही तर गाणी.. फॅशन शो अशा सगळ्याच गोष्टींनी परिपूर्ण अशा ‘विजन २०१५ ’च्या ग्रँड फिनालेला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद लाभला. मराठी िचत्रपटसृष्टीतील अभिनेत्री सई ताह्मणकर हिच्या आगमनानंतर कार्यक्रमाला अधिकच रंगत चढली.

दादासाहेब गायकवाड सभागृहात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी(दि. २७) या यूथफेस्टचा ग्रँड फिनाले पार पडला. यामध्ये सुरुवातीस काही गाणी सादर झाली. त्यानंतर सोलो डान्स ग्रुप डान्स सादर झाले. कार्यक्रमांचे परिक्षण अलका अंबोरे, आदित्य निकम, चेतन शिंपी, प्रीतम जुंदरे, तेजस्वी देसाई, हेमल ठक्कर यांनी केले. प्रारंभी विशेष अतिथी गजानन शेलार, आयोजक नंदन भास्करे, दीपक वाघ, गणेश बनकर आदींचा सत्कार झाला.

सई ताह्मणकर, संजय जाधव विशेष अतिथी
कार्यक्रमाच्याशेवटी विशेष अतिथी म्हणून दुनियादारीचे दिग्दर्शक संजय जाधव अभिनेत्री सई ताह्मणकर यांनी हजेरी लावली. आल्या आल्या तीने मंच काबीज केला. आपल्याला उशीर झाल्याबद्दल या कलाकारांनी प्रेक्षकांची माफीही मागितली. यावेळी प्रेक्षकांनी या कलाकारांना उत्स्फूर्त दाद दिली