आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिका अतिरिक्त अायुक्तपदी बोर्डे; सोनवणे जळगावचे आयुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिक महापालिकेत अत्यंत कमी काळात अापल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे यांची जळगाव महापालिकेत अायुक्त म्हणून बदली झाली असून, त्यांच्या जागी जळगाव पालिकेचे अायुक्त किशाेर बाेर्डे यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे. विशेष म्हणजे अवघ्या दहा दिवसांत बाेर्डे यांची बदली करून साेनवणे यांना अाॅन डिमांड जळगाव येथे नेल्याचेही सांगितले जाते.
साेनवणे यांची जेमतेम वर्षभरात बदली झाली असून, जळगाव अायुक्तपदी तेथील स्थानिक लाेकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे त्यांना नियुक्त केल्याचे सांगितले जाते. साेनवणे यांनी यापूर्वी धुळे भिवंडी महापालिकेत अायुक्त म्हणून काम बघितले अाहे. दरम्यान, नाशिक पालिकेच्या अतिरिक्त अायुक्तपदी नियुक्ती झालेल्या बाेर्डे यांची जेमतेम दहा दिवसांपूर्वी जळगाव अायुक्तपदी बदली झाली हाेती. त्यापूर्वी मालेगाव येथे अायुक्त म्हणून त्यांनी काम बघितले हाेते. तेथून मे महिन्यात बदली झाल्यानंतर जून सरला तरी त्यांना पदस्थापना मिळाली नव्हती.

अनधिकृत बांधकामावर हाताेडा, कालिदास नूतनीकरणात हातभार : महापालिकेला‘ब’ वर्गाचा दर्जा मिळाल्यानंतर दाेन अतिरिक्त अायुक्त पदे निर्माण झाली. त्यात पहिली पदस्थापना जीवन साेनवणे यांची २० एप्रिल २०१५ राेजी झाली. परिस्थितीनुरूप मृदू कणखर स्वभावाच्या साेनवणे यांनी पहिल्यापासूनच कामावर पकड मिळवली. खासकरून अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांचा उजवा हात अशीच त्यांची अाेळख हाेती. सिंहस्थ कुंभमेळ्यात गेडाम यांच्यासाेबत साेनवणे यांनी अत्यंत महत्त्वाच्या अाराेग्य, पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी चाेख बजावली. स्थायी समिती महासभेत वादग्रस्त विषयांना अायुक्तांच्या अनुपस्थितीत हाताळण्यातही त्यांची ख्याती हाेती. पाण्याच्या मुद्यावर त्यांनी सर्वपक्षीय संघर्षाला ताेंड दिले हाेते. साेनवणे यांनी शहरातील अनधिकृत बांधकाम अतिक्रमणाविराेधात माेहीम उघडली. त्यांनी अशा बांधकामाचे वर्गीकरण करून त्यांचा कालबद्ध कार्यक्रमही तयार केला. यापूर्वी काेणतेही अतिक्रमण वा अनधिकृत बांधकाम साेयीसाेयीने काढण्याचे प्रकार लक्षात घेत त्यामुळे प्रशासनातील अपप्रवृत्तींना जरब बसली हाेती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सांस्कृतिक चळवळीशी समरस असल्यामुळे कालिदास कलामंदिराचे सात काेटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव त्यांच्याच प्रयत्नामुळे अंतिम टप्प्यात अाहे. साेनवणे येत्या दीड वर्षात निवृत्त हाेणार अाहेत.

शिक्षण समितीवर पुन्हा उपासनी
‘ब’वर्ग महापालिकेत अाता शिक्षण समिती प्रशासन अधिकारी म्हणून यापूर्वी वादग्रस्त असलेल्या नितीन उपासनी यांची नियुक्ती झाली अाहे. सध्याचे प्रशासनाधिकारी उमेश डाेंगरे यांना अद्याप पदस्थापना मिळालेली नाही. दरम्यान, समितीवर गटशिक्षणाधिकारी दर्जाचे दाेन पद भरण्यास शासनाने मान्यता दिल्याचे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...