आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adesh Bandekar News In Marathi, Shiv Sena, Mahayuti, Nashik, Divya Marathi

शिवसेनेचे स्टार प्रचारक आदेश बांदेकरांची आज प्रचार सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शिवसेनेचे स्टार प्रचारक तथा होम मिनिस्टर (भाऊजी) फेम आदेश बांदेकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी सायंकाळी 5 वाजता अशोक स्तंभापासून प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. तसेच सकाळी 10.30 वाजता त्र्यंबकेश्वर येथेही रॅली काढण्यात येणार आहे.


महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ निघाणारी रॅली अशोक स्तंभापासून सुरु होईल. गोदावरीनगर, मल्हार गेट पोलिस चौकी, रेडक्रॉस, घनकर लेन, गंगावाडी, सुंदर नारायण मंदिर, गोरेराम लेन, चांदीचा गणपती, सराफ बाजार, दहीपूल, मेनरोड, बोहरपट्टी, गाडगे महाराज पुतळा असे मार्गक्रमण करीत रॅलीचा समारोप पिंपळचौकात होणार आहे.


उद्धव ठाकरे यांची उद्या नाशिकमध्ये होणार सभा
नाशिक लोकसभा मतदारसंघाचे हेमंत गोडसे व दिंडोरी मतदार संघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा येत्या शुक्रवारी (दि. 18) रोजी सायंकाळी 5 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे. या सभेत मराठा आरक्षणाचे प्रणेते, शिवसंग्राम परिषदेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनाही बोलविण्यात आल्याचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले. सभेसाठीच्या तयारीत सध्या सेनेचे पदाधिकारी दिसत आहे. एकीकडे प्रचाराची रणधुमाळी आणि दुसरीकडे सभेचे नियोजन यामुळे पदाधिकार्‍यांची मोठीच दमछाक होत आहे.