आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेट्सअभावी एक लाख नाशिककरांचे ‘आधार’ गेले परत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- आधारकार्ड परत जाण्याच्या बाबतीत नाशिक आघाडीवर असून, आतापर्यंत तब्बल एक लाखाहून अधिक आधारकार्ड टपाल खात्याकडून परत गेली आहेत.

‘स्टेटस अपडेट’अभावी ती कार्ड नेमकी कोठे आहेत, याचा थांगपत्ताच नाही. ‘बेबसाइटवर कार्डाचे स्टेटस नाही, टपाल खात्यात कार्ड आलेच नाही, अशा उत्तरांनी जवळपास दोन लाख लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. आधारकार्ड नागरिकांपर्यंत पोचते करण्याची जबाबदारी टपाल खात्याची आहे. चुकीचा पत्ता, पत्त्यावर ती व्यक्ती नसणे, स्थलांतर आदी कारणांमुळे टपाल परत गेल्याची कारणे टपाल खात्याकडून दिली जातात. मात्र यात लाखो नागरिकांना मनस्ताप होतो.

आधार कार्डसाठी नागरिकांनी रांगा लावून नोंदणी केली होती. मात्र त्यांना दिड वर्षानंतरही ते मिळालेले नाही. बेबसाइटवर स्थितीही कळत नाही. टपाल कार्यालयात गेल्यावर तर कार्ड आलेच नसल्याचे उत्तर टपाल कार्यालयाकडून नागरिकांना मिळते. अशा अनास्थेच्या कात्रीत नागरिक सापडले आहेत. ज्या नागरिकांनी नोंदणी करुन छायाचित्र काढले त्यांना पावती देण्यात आली. त्यातील नंबरवरुन बेबसाइटवर कार्डाचे स्टेटस उपलब्ध नाही. टपाल कार्यालयातसुध्दा कार्ड आले नसल्याचे सांगण्यात येते त्यामुळे आधार कार्ड मिळणे अवघड झाले आहे. आता जी कार्ड परत गेली त्यांचे काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या वेबसाइटवर करता येईल तपास
सहा महिन्यांनंतरही आधारकार्ड मिळाले नसल्यास, help@uidai.gov.in वेबसाइटवर किंवा केंद्राचे टोल फ्री क्रमांक 18003001947 वर संपर्क साधावा, असे आवाहन आधार केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

कारण चुकीच्या पत्त्यांचे
आधारकार्डची माहिती वेबसाइटवर सहा महिन्यांनंतर दिसते. जिल्ह्यात सुमारे एक लाखांहून अधिक आधारकार्ड चुकीचा पत्ता, आहे त्या पत्त्यावर व्यक्ती नसणे, स्थलांतर अशा कारणांमुळे टपाल परत गेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आधार केंद्रावर संपर्क साधावा किंवा वेबसाइटवर आधार नंबर टाकून आधारकार्डची प्रिन्ट काढावी.
-जहूर शेख, व्यवस्थापक, नाशिक जिल्हा आधार केंद्र

दीड वर्षानंतरही निराधारच
आधारकार्डसाठी अर्ज भरुन दीड वर्ष झाले तरी ते मिळत नाही बेबसाइटवर स्थितीही कळत नाही. टपाल कार्यालयात कार्ड आलेच नसल्याचे म्हणतात. कार्ड परत गेले असेल तर आता आम्ही काय करायचे, याचे प्रशासनाने उत्तर द्यावे.
-अजीम पटेल, नागरिक