आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झोपी गेलेले जागे झाले; विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार ‘आधार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विद्यार्थ्यांना आधारकार्ड सादर करण्यासाठी शाळांनी कुठलेही वेळेचे बंधन घालू नये असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकार्‍यांनी देत आता शाळेतच आधारचे किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाळांनी बोनाफाइड देत त्वरित आधारकार्ड शाळेत जमा करण्यासाठी धरलेल्या आग्रहानुसार पालकांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही.

शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढण्यासाठी शाळांनी विद्यार्थ्यांवर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली आहे. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी हा निर्णय घेतला असून, टप्प्याटप्यांनी शाळांमध्ये आधारकार्डचे किटही उफलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी संख्येनुसार शाळा निश्चित केल्या जातील. त्यानुसार काम सुरू होईल. 75 किटच्या मनुष्यबळासाठी दोन दिवसांत निविदा काढण्यात येणार असून, त्यानुसार शहरातील शाळेत जवळपास 20 किट उपलब्ध करून दिले जाणार आहे. उर्वरित किट ग्रामीण भागात दिले जातील. असे उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव यांनी सांगितले.