आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘आधार’ने सुटीला मुकले चिमुकले; 50 ऐवजी घेतले 200 अर्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- केंद्राने शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड बंधनकारक केल्याने शाळांनी या कार्डची सक्ती केली आहे. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थी व पालकांची आधारसाठी नोंदणी करताना मोठी परवड होत आहे. या मुद्यावर विद्यार्थी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. रविवारची सुटी असूनही सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी आधार केंद्रांवर गर्दी केल्याने विद्यार्थ्यांची सुटी वाया गेली.

‘दिव्य मराठी’च्या याबाबतच्या वृत्तानंतर नाशिकरोड केंद्रावर दोन यंत्रे वाढविण्यात आली. 50 ऐवजी 200 अर्ज स्वीकारण्यात आले. रविवार असल्याने आधारकार्ड काढण्यासाठी केंद्रावर दुपटीने संख्या वाढली होती. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहर्‍यावर चिंतेचे सावट होते.

मिलीभगतचा आरोप
आधारकार्डचा ठेका दिलेल्या एजन्सीने अर्ज संपल्याचा फलक लावला आहे. दुकानांमध्ये अर्ज पाच रुपयांना विक्री होत असल्याने पालकांमध्ये हा एजन्सीचा डाव असल्याची चर्चा होती.

अडवणुकीचा प्रकार
मुलांच्या आधारकार्डसाठी शाळेतून बोनाफाईड प्रमाणपत्र आणण्याची मागणी केली जाते. शाळांतून ते प्रमाणपत्र मिळत नसल्याने एजन्सीचे कर्मचारी अडवणूक करतात. जयर्शी खालकर, पालक