आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आधार’साठी विद्यार्थ्यांकडून १०० रुपये!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्रराज्य सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला दस्तावेज म्हणून आधारकार्ड नि:शुल्क उपलब्ध करून देण्याची योजना राबवित आहे. परंतु, काही लोकांनी याला पैसे कमावण्याचा धंदा बनविल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला बँक खाते बंधनकारक केल्याने शहरातील विविध शाळांत काही लोकांनी अाधार केंद्रे उघडली असून, रांगेत लागता १०० रुपयांत आधारकार्ड बनवून दिले जात आहे.
भारतीय नागरिकत्वाची ओळख असलेले आधारकार्ड काढणे केंद्र सरकारने सक्तीचे केल्याने, तसेच विविध योजनांसाठी ते लाभदायी ठरणार असल्याने नागरिकांनी रांगा लावून आधारसाठी नोंदणी सुरू अाहे. आधारकार्ड काढण्यासाठी कोणतेही पैसे आकारण्यात येत नसले, तरी शहराच्या काही भागांत मात्र नोंदणीसाठी तथा आधारकार्ड घरपोच आणून देण्यासाठी पैसे आकारले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून शाळा प्रशासनाकडून बँक खाते बंधनकारक केल्याने विविध शाळांत काही लोकांनी अाधार केंद्र उघडली अाहेत. या ठिकाणी रांगेत उभे राहता १०० रुपयांत आधारकार्ड बनवून दिले जात आहे. तसेच काही परिसरात आधारकार्ड नोंदणीची प्रिंट लॅमिनेशन करून देण्याच्या नावाखाली ५० ते ७० रुपये घेतले जात आहेत, तर शहरातील सिडको, सातपूर, जुने नाशिक, नाशिकरोड, पंचवटी परिसरातील खासगी शाळेत आधारकार्ड काढण्याचा दर १०० ते १५० रुपयांपर्यंत असल्याचे दिसून अाले आहे.

अधिकारीही अनभिज्ञ : शहरातीलकाही शाळांत सर्रास आधारकार्ड नोंदणीसाठी १०० ते १५० रुपयांपर्यंत पैसे घेऊन लूट सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणेने याकडे काणाडोळा केल्याने सर्वांचेच फावत आहे. सध्या सर्व विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळावे, यासाठी नोंदणी सुरू आहे. मात्र, ही नोंदणी कोठे सुरू आहे याबाबत जबाबदार अधिकारीच अनभिज्ञ असल्याचे दिसून अाले.

नि:शुल्क सुरू अाहे नोंदणी...
^शहरात कार्वीकंपनीच्या आधारकार्ड एजन्सीमार्फत नोंदणी सुरू आहे. या केंद्रात कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत. नागरिकांकडून कोणी पैशांची मागणी करीत असेल, तर त्याची तक्रार तातडीने कार्वी एजन्सीत करावी. -शाहनवाज शेख, जिल्हा व्यवस्थापक, कार्वी आधारकार्ड एजन्सी

प्रशासनाने लक्ष द्यावे...
^अनेक शाळांत पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना आधारकार्ड सक्तीचे केल्याने आधार केंद्रात प्रचंड गर्दी होत आहे, तर काही शाळांमध्येच आधार किट लावले अाहेत. मात्र, या ठिकाणी एका विद्यार्थ्यासाठी १०० ते १५० रुपये घेतले जात आहेत. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून आधार नोंदणी मोहीम राबवावी. -रियाज सय्यद, पालक
बातम्या आणखी आहेत...