आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदारांच्या कार्डला आता आधार लिंकिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरू असून, आता मतदान कार्डास आधारचीच जोडणी करण्याचा निर्णय घेत जोडणीसाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दलिी आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने त्याची त्वरित जोडणी करण्याचे आवाहन निवडणूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मार्च ते ३१ जुलैदरम्यान याद्या प्रमाणिकरण आणि शुद्धीकरणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे. ज्या मतदारांनी त्याचे अद्ययावतीकरण करण्यासह दोन्ही नंबर लिंक केले नाही, अशांनी आगामी निवडणुकांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्वरित त्याची जोडणी करणे अनिवार्य असल्याचे निवडणूक शाखेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी िनवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन मतदारांना आपले मतदार कार्ड लिंक करता येईल. आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे त्यासाठी आधार क्रमांकासह माहिती भरावी लागेल.


मतदान कार्ड असे करता येईल लिंक
- निवडणूकआयोगाच्या http:// eci.nic.in या संकेतस्थळावर राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर आधार क्रमांक इतर माहिती भरता येईल.

- शिवाय १६६/ ५१९६९ या क्रमांकावर ECILINK < EPIC_Number> स्पेस असे भरता येईल.

- http:// ceo.maharastara.gov.in या संकेतस्थ‌ळावर अपडेट युवर आधार इन इलेक्ट्रोरोल नंतर नाव, आधार नंबर, मतदान कार्ड नंबर, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, क्लिक सबसमिट बटण. किंवा www.nvsp.in यातून आधार फिड लिंकवर जाता येईल.