आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा : साध्‍वींनी फडकवला विद्रोहाचा झेंडा; समकक्ष हक्‍क देण्‍याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांधू सोबत चर्चा करताना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस - Divya Marathi
सांधू सोबत चर्चा करताना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक – गोदातिरी आज (मंगळवार) पासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली. 25 सप्‍टेंबरला त्‍याचा समारोप होणार आहे. दरम्‍यान, आज पहाटे या ठिकाणी ध्‍वजारोहण होताच साध्‍वींच्‍या एका संघटनेने बंडाचा ध्‍वज फडकावत या सोहळ्यात पुरुष साधूंच्‍या बरोबरीने सन्‍मान देण्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली केली. शिवाय त्‍यांनी वेगळ्या आखाड्याची मागणी केली आहे. एवढेच नाही तर शाही स्‍नानासाठी जागेची मागणीसुद्धा केली आहे. या मागणीसाठी साध्‍वींनी आज झालेल्‍या सोहळ्यात थेट व्‍यासपीठावर जाऊन गोंधळ घातला.
या बाबत साध्वी त्रिकाल भैरवनाथ सरस्वती महाराज म्‍हणाल्‍या , ‘‘ वेगळ्या आखाड्यासाठी आम्‍ही जिल्‍हाधिका-यांपासून ते मंत्र्यांना निवेदन दिले आहे. त्‍यांनी आम्‍हाला आश्‍वासनही दिले होते. पण, मेळा सुरू झाला तरीही त्‍याची पूर्तता केली गेली नाही. पुरुषांच्‍या बरोबरीने महिला या धार्मिक कार्यक्रमात भाग घेतात. असे असताना महिला साधू या पुरुष साधूच्‍या एकाही आखाड्याचा भाग नाहीत. त्‍यामुळे त्‍यांना स्‍वतंत्र आखाडा मिळायलाच हवा. आम्‍हाला जर स्‍वतंत्र आखाडा मिळाला तर या ठिकाणी अजून 15 हजार स्‍वाधी येणार आहेत’’, अशी माहितीही त्‍यांनी दिली.
पुढील स्‍लाइडवर वाचा आखाडा म्‍हणजे नेमके काय?