आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aditi Khodke News In Marathi, United Nations, Divya Marathi

नाशिकच्या अदिती खोडकेची आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी संयुक्त राष्‍ट्राकडून निवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आपत्ती व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी संयुक्त राष्‍ट्राने नाशिकच्या अदिती नितीन खोडके या विद्यार्थिनीची निवड केली आहे. टोकियो येथे दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी जपान सरकार तिला शिष्यवृत्तीही देणार आहे. या अभ्यासक्रमासाठी निवडण्यात आलेली देशातील एकमेव विद्यार्थिनी आहे.

नाशिकच्या रंगुबाई जुन्नरे विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या अदितीने पुणे येथील कमिन्स आर्किटेक्चर कॉलेजमध्ये बी. आर्किटेक्ट ही पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. सामाजिक जाणिवेचे भान ठेवून तिने अनेक प्रबंध लिहिले. या प्रबंधात मांडलेल्या विचारातूनच रेल्वेत वृद्ध व अपंगांना तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुविधा देण्याची तरतूद केली होती. तसेच तिच्या ‘वृद्धाश्रम’या प्रबंधास पुणे विद्यापीठाने गौरवले आहे. कथ्थक नृत्यामध्येही तिने विशेष प्रावीण्य मिळवले आहे.

समाजासाठी काहीतरी करण्याची तिची धडपड बघूनच संयुक्त राष्‍ट्राने या अभ्यासक्रमासाठी आदितीची निवड केली. या निवडीबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.