आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aditya Kudre Winner Of Australian Quiz Competition

नाशिकचा आदित्य ‘ऑस्ट्रेलियन क्विझ’चा विजेता, अाॅस्ट्रेलियन केमिकल इन्स्टिट्यूटच्या स्पर्धेत यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अापल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या संधी फार कमी लोकांना मिळते, हीच संधी नाशिकच्या आदित्य कुद्रे या अाठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सार्थकी लावली अांतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. नाशिकमधील किलबिल शाळेतील या विद्यार्थ्याने अाॅस्ट्रेलियन केमिकल इन्स्टिट्यूटने घेतलेल्या केमिस्ट्री क्विझ स्पर्धेत विजेतेपद मिळवले आहे.
या व्यतिरिक्त या विद्यार्थ्याला तब्बल १५ पुरस्कार मिळालेले आहेत. ‘अॅस्ट्राे फिजिक्स’ या विषयात विशेष रुची असणारा आदित्य हा विशेष प्रशिक्षणांमध्ये सातत्याने भाग घेत असताे. नाशिकमध्ये झालेल्या नॅशनल स्पेस विकचाही अादित्य विजेता ठरला हाेता. अादित्यचे हे यश लहान मुलांसाठी विशेष प्रेरणा देणारे ठरले अाहे. आदित्य दहा वर्षांचा हाेता तेव्हापासून ताे विज्ञान विषयात पारंगत अाहे. तेव्हापासून सुरू केलेल्या परिश्रमांचे फलित त्याला वेळोवेळी मिळाले अाहे. यामध्ये प्रामुख्याने ऑस्ट्रेलियातील या विशेष पुरस्काराचा समावेश अाहे. या स्पर्धेमध्ये भारतासह जगभरातील प्रमुख राष्ट्रांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. समवयस्कच नाही तर अाठवी ते दहावीच्या वयाेगटासाठी ही स्पर्धा हाेत असते. ज्यामध्ये आदित्यला २५ वेगवेगळ्या राष्ट्रांतून पारितोषिक मिळाले आहे.

या पूर्वी त्याला राष्ट्रीय स्तरावर दाेन पारितोषिके मिळालेली आहेत. रॉयल ऑस्ट्रेलिया केमिकल इन्स्टिट्यूटतर्फे घेतलेल्या या स्पर्धेमध्ये ‘अवाॅर्ड ऑफ एक्सलन्स’ त्याने मिळविलेला आहे.
हा पुरस्कार मिळविणारा अादित्य हा पहिला नाशिककर आहे, शिवाय भारतातही या स्पर्धेत सहभाग घेण्याचे नगण्य प्रमाण अाहे. फार कमी विद्यार्थी या स्पर्धेपर्यंत पोहोचू शकले आहेत. आदित्यबराेबर याबाबत चर्चा केली असता स्पेस आणि अॅस्ट्राे फिजिक्स या विषयांमध्ये असलेले त्याचे ज्ञान त्याला इथपर्यंत घेऊन आले आहे. शिवाय स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा जिंकणे सहजशक्य झाल्याचे ताे सांगताे.