आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aditya Thackeray News In Marathi, Road Show In Nashik, Lok Sabha Election

नाशकात शुक्रवारी आदित्य ठाकरेंचा रोड शो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - उध्दव ठाकरे यांची सभा निश्चित झाल्यानंतर शिवसेनेने आता तरुणांवर लक्ष केंद्रित करीत येत्या शुक्रवारी (11 एप्रिल) आदित्य ठाकरे यांच्या रोड शोचे आयोजन केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी हा रोड शो होणार आहे. रोड शोनंतर आदित्य यांची सभाही होणार आहे.


शिवसेनेने येत्या शुक्रवारी (दि. 18) पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांची सभा आयोजित केली आहे. या सभेपूर्वी वातावरण निर्मितीसाठी येत्या शुक्रवारी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या रोड शोचे नियोजन सुरू झाले आहे. हा रोड शो सायंकाळी 5 वाजता सुरू होईल. त्यानंतर 7 वाजता आदित्य यांची जाहीर सभा होणार आहे. सभेचे स्थळ मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.