आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाच्या वाढत्या टक्केवारीने प्रशासन समाधानी, प्रभाग 2 मध्ये सर्वाधिक मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मतदानाची टक्केवारी वाढावी, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत अखेरच्या क्षणापर्यंत मतदार दक्ष राहावे, यासाठी राज्य निवडणूक अायाेगाने माेठ्या प्रमाणात जागृती केल्यानंतरही नाशिकमधील मतदानाच्या टक्केवारीचा अालेख म्हणावा तसा वाढला नाही. मात्र, प्रशासन टक्के वाढीव मतदानाबाबत समाधानी असून, प्रभाग २० मध्ये सर्वात कमी ५५.०७, तर प्रभाग मध्ये ६८.९७ टक्के इतके सर्वाधिक मतदान झाले. 
 
महापालिका निवडणुकीत यंदा मतदार जागृतीसाठी अनेक उपक्रम झाले. मतदारांचे हक्क अधिकार याबाबत जागृतीसाठी सर्व स्तरातील सेलिब्रिटींना सामावून घेण्यात अाले. विविध स्पर्धांपासून तर सायकल रॅली अन्य कार्यक्रमही झाले. दरम्यान, त्याचा परिणाम म्हणून यंदा ६२ टक्क्यांपर्यंत मतदान झाले. २०१२ मधील निवडणुकीत ५७ टक्के मतदान झाले असल्यामुळे टक्के वाढीव मतदानाची बाब प्रशासनाला सुखावली अाहे. मात्र, नगरसेवक वा उमेदवारांचा विचार केला तर मतदानाची टक्केवारी यापेक्षाही अधिक वाढली असती. 

यंदा केंद्रनिहाय मतदान याद्यांचे विभाजन केल्याने अनेक घाेळ झाले. एकाच कुटुंबातील पती भलत्याच केंद्रावर तर पत्नी दुसऱ्या केंद्रावर अशी विचित्र विभागणी झाली. त्यात अनेकांना मतदान केंद्रावर जाऊन नावच सापडल्याने त्यांनी थेट घरचा रस्ता पकडला. काहींचे मतदान दुसऱ्याच प्रभागात गेल्याने त्यांनीही अघाेषित बहिष्कार टाकला. परिणामी, मतदानाची टक्केवारी घटल्याचे उमेदवारांचे म्हणणे अाहे. 
 
..तरलेखी तक्रार करा 
दरम्यान,मतदान केंद्रातील कुटुंबाच्या नाव विभागणीमुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याच्या तक्रारीबाबत अायुक्तांना विचारले असता त्यांनी मतदार यादी अंतिम करताना हरकती का घेतल्या नाही, असा प्रश्न केला. त्यावेळी उमेदवार नगरसेवकांनी फारसे लक्ष दिले नसल्याचे दिसते.
 
नाशिकराेडमधील मतदार यादीबाबत घाेळाची माहिती घेतली असता, जी मतदार यादी दुरुस्त हाेत हाेती तीच अधिकृत धरल्यामुळे गाेंधळ झाल्याचे लक्षात अाले. अनेक ठिकाणी अचूक पत्ता नसल्यामुळे शेजारील प्रभागात नावे स्थलांतरित झाली असावी, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. अाताही अाक्षेप असेल तर तक्रार करावी, असेही अावाहन त्यांनी केले. 
 
सर्वाधिक मतदान येथे झाले 
प्रभाग - ६८.९७ 
प्रभाग १० - ६७.३५ 
प्रभाग १८ - ६५.५९ 
प्रभाग ०९ - ६४.९७ 
प्रभाग ३१ - ६४.७१ 
 
सर्वात कमी मतदान येथे झाले 
प्रभाग २० - ५५.०७ 
प्रभाग - ५६.५९ 
प्रभाग १२ - ५८.८४ 
प्रभाग १७ - ५९.०६ 
प्रभाग १६ - ५९.१६ 
बातम्या आणखी आहेत...