आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Administrative Decisions Of Savitribai Phule Pune University

15 दिवस आधीसुद्धा भरता येणार परीक्षेचा अर्ज, मुदतीनंतर द्यावा लागेल पंधराशे रुपये दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या परीक्षांचे अर्ज भरू शकलेल्या िवद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परीक्षेच्या १५ िदवस अाधीपर्यंत देखील अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून िदली अाहे. मात्र, त्यासाठी त्यांना दर आठवड्यासाठी तब्बल पंधराशे रुपये दंड (िवलंब शुल्क) भरावा लागेल.

विद्यापीठाने निर्धािरत मुदत टळून गेल्यानंतर परीक्षेचे अर्ज भरण्याची सवलत बंद केली हाेती, मात्र िवद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेऊ नये, त्यांना परीक्षा देता यावी, यासाठी ही सवलत पुन्हा देण्याची मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड या संघटनेकडून करण्यात अाली. त्याला प्राचार्यांनीही अनुमाेदन िदले हाेते. वर्ष २०१५ च्या प्रथमार्धात होणाऱ्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. तरीही ज्यांनी अर्ज भरलेला नाही, त्यांच्यासाठी पुढील कालावधीतही ही सवलत मिळेल. प्रात्यक्षिक किंवा लेखी परीक्षेच्या पंधरा दिवस अाधीपर्यंत विद्यार्थ्यांना दंडासह अर्ज भरता येईल. असे अर्ज िवद्यार्थी महाविद्यालयामध्यचे सादर करतील. ते त्या आठवड्यातच इनवर्ड करावे लागणार अाहेत.