आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सऱ्या गुणवत्ता यादीत विज्ञान ९२, वाणिज्य ८२ टक्क्यांवर प्रवेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अकरावी प्रवेशासाठीच्या पहिल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीने यंदा प्रथमच उच्चांक गाठल्याने या दोन्ही यादीत स्थान मिळू शकलेल्या हजारो विद्यार्थ्यांची आशा तिसऱ्या गुणवत्ता यादीकडे लागून राहिली होती. मात्र, सोमवारी (दि. २९) शहरातील प्रमुख महाविद्यालयांत जाहीर झालेल्या तिसऱ्या गुणवत्ता यादीने उच्चांक कायम ठेवला असून, विज्ञान शाखेसाठी ९२.४०, तर वाणिज्य शाखेचा कट अॉफ पूर्वीपेक्षा अवघ्या एका टक्क्याने म्हणजेच ८२ टक्क्यांवर राहिला आहे. त्यामुळे प्रमुख महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचे स्वप्न धुसर झाले असून, आता विनाअनुदानितच्या जागांवर प्रवेश घेण्याचा पर्याय विद्यार्थ्यांपुढे अाहे.

अकरावी अभ्यासक्रम असलेली शहरात ५१ कॉलेजेस असून, त्यात कला, विज्ञान, वाणिज्य संयुक्त शाखेच्या २० हजार ८६० जागा आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीने उच्चांक गाठल्याने त्यात केवळ ४५८८ प्रवेश निश्चित झाले, तर दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर ५८२८ प्रवेश निश्चित झाले. पहिल्या दोन्ही याद्यांनी विज्ञान शाखेच्या कट ऑफ ९२ टक्क्यांच्या पुढेच राहिला, तर वाणिज्यचा कट ऑफही ८२ टक्क्यांवर राहिला. तिसऱ्या गुणवत्ता यादीत हा कट ऑफ कमी होईल, अशी अपेक्षा असताना प्रमुख महाविद्यालयांत अवघ्या एक टक्क्याने कट ऑफ खाली आहे. त्यामुळे या महाविद्यालयांत प्रवेशासाठी यंदा मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
आता विनाअनुदानित जागांचा पर्याय
अकरावीप्रवेशाच्या पहिल्या, दुसऱ्या तिसऱ्या गुणवत्ता यादीत कट ऑफ आलेख कमी झाल्याने हजारो विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित आहेत. त्यातच अनुदानित जागांवर प्रवेश पूर्ण झाल्याने आता जुलै रोजी विनाअनुदानित जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर होणार अाहे. त्यानंतर जुलै रोजी शिल्लक जागांसाठी मॅनेजमेंट कोट्याच्या माध्यमातून प्रवेश दिला जाईल. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांना हजारो रुपयांचे शुल्क भरावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...