आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्टर ऑफ फार्मसीसाठी २३ जूनपासून प्रवेशप्रक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे २०१५ २०१६ च्या मास्टर ऑफ फार्मसी अभ्यासक्रमासाठी १७ मे रोजी झालेल्या "एमएएच-एमपीएच-सीईटी' या प्रवेशपरीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता मंगळवारपासून (दि. २३) प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.
एम. फार्मसीच्या १५ महाविद्यालयांत ४५० जागा असून २३ जून रोजी राउंड १-ए नुसार स्पॉन्सर्ड गटातील विद्यार्थ्यांना यादीप्रमाणे प्रवेश दिला जाणार आहे, तर राउंड २-बी नुसार खुल्या गटातील विद्यार्थ्यांना २४ ते २६ जूनदरम्यान गुणवत्ता यादीप्रमाणे प्रवेश दिला जाईल. इतर प्रवर्गासाठी २७ जून रोजी प्रवेश दिला जाईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी जुलैपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन नोंदणी करावी. जुलै रोजी जागांची यादी जाहीर हाेईल, त्यानंतर राउंड २-ए सुरू होणार आहे. १० जुलैपर्यंत या फेरीतील प्रवेशप्रकिया असून, १८ जुलै रोजी रिक्त जागांची माहिती जाहीर हाेईल. २० ते ३० जुलै दरम्यान संस्थात्मक स्तरावरील जागांसाठी प्रवेशप्रक्रिया. प्रवेशासंंबंधीची माहिती www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर आहे.
२८ कॉलेज; ५७९ जागा
विभाग कॉलेज जागा
नाशिक ११ २३३
धुळे ०४ ११६
नंदुरबार ०२ ४३
जळगाव ०४ ५८
अहमदनगर ०७ १२९
एकूण २८ ५७९
३६ विद्यार्थ्यांना मिळणार थेट प्रवेश
एआयसीटीईतर्फे घेण्यात आलेल्या ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पॅट) उत्तीर्ण ३६ विद्यार्थ्यांना एम. फार्मसीसाठी थेट प्रवेश मिळणार आहे. त्यांना एम. फार्मसीचे शिक्षण घेताना एआयसीटीईकडून १२,४०० रुपये महिना विद्यावेतन मिळेल.
बातम्या आणखी आहेत...