आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रोक्त तपासाकरिता पोलिसांना ‘अत्याधुिनक तपास किट’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - खून,दराेडा, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना पुरेशा साधनसामग्रीअभावी पोलिसांना घटनास्थळी शास्त्राेक्त पुरावे जमा करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी अाता नाशिक पाेलिस अायुक्तालयातील कर्मचाऱ्यांना ‘अत्याधुिनक इन्व्हेस्टिगेशन किट’ उपलब्ध हाेणार अाहे. या किटमध्ये लॅपटाॅप, स्कॅनर कॅमेऱ्यासारख्या वस्तूंसह खडू, माेजमापासाठी लागणाऱ्या टेपचा समावेश असल्याने गुन्ह्यांच्या गतिमान तपासासाठी उपयुक्त ठरणार अाहे.

शहरातील वाढती गुन्हेगारी राेखण्यासाठी अाणि खून, दराेडा, बलात्कार, लुटमारी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतील तपासासाठी घटनास्थळी पुरावे जमा करताना अनेक अडचणी येतात. घटनास्थळी पाेलिसांची प्राथमिकता वस्तुजन्य पुरावे जमा करणे अावश्यक असते. मात्र, घाईगर्दीत पाेलिसांना वेळेवर काही साधनेच मिळत नसल्याने विलंब हाेताे. त्यातूनच न्यायालयात पुरावे सादर करताना शास्त्राेक्त पुरावे हाती लागत नसल्याने गंभीर गुन्ह्यातील अाराेपी निर्दोष सुटतात. तपास यंत्रणेतील याच त्रुटी कमी करण्यासाठी अाणि काैशल्यपूर्ण तपासाला गती मिळण्यासाठी अायुक्तालयातीला तेराही पोलिस ठाणे आणि तीन स्वतंत्र गुन्हा शाेध पथकांना अत्याधुिनक किटचे वाटप केले जाणार आहे. काही वर्षांत प्रथमच गुन्ह्यांच्या सिद्धतेसाठी वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना वेगवेगळी प्रशिक्षणे दिली जात अाहेत. त्याचबराेबर महासंचालक कार्यालयाकडून तपासासाठी निधीही उपलब्ध करून दिला जात अाहे. याच निधीअंतर्गत पोलिस आयुक्तांना पाेलिस ठाणेनिहाय काही प्रमाणात निधी उपलब्ध झाला अाहे. त्यातूनच हे किट खरेदी करण्यात अाले अाहे.
इनव्हेस्टिगेशन किटमध्ये अत्याधुनिक साधने : गुन्हा घडलेल्या जागी पाेलिसांना जागेची माेजमाप करण्यासाठी अावश्यक असणारा टेप, फुलपट्टी, दिशा ठरविण्यासाठीचे हाेकायंत्र, खडू, छिन्नी, हाताेडी, कैची, मार्कर, मास्क, घटनास्थळावरील पुराव्यांवर काेणतेही ठसे उमटू नयेत, पुरावा नष्ट हाेऊ नये यासाठी हातमाेजे, हातोडा, टोचा, कार्बन पेपर, पुरावे जमा केल्यावर ते पॅकबंद करण्यासाठी लाख, टाचणी, रबरबॅण्ड आणि रक्ताचे नमुने घेण्यासाठी काचेच्या बाटल्या, सिरींज यांसह कापसाचाही त्यात समावेश अाहे. याबराेबरच प्रथमतचा तपासाला गती येण्यासाठी लॅपटाॅप, स्कॅनर, प्रिंटर आणि कॅमेरा या किटमध्ये असणार अाहे.

अाराेपींच्या शिक्षेच्या प्रमाणात वाढ
नक्षलग्रस्त गडचिराेली,चंद्रपूरपाठाेपाठ मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये पाेलिसांना हे अत्याधुिनक किट पाेलिसांना उपलब्ध झाले अाहेत. त्याच पार्श्वभूमीवर नाशकात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांत पाेलिसांना घटनास्थळावरील शास्त्राेक्त पुरावे जमा करण्यासाठी हे किट उपयुक्त ठरणार अाहेत. त्याचबराेबर गुन्हा सिद्धतेच्या प्रमाणात निश्चित वाढ हाेऊन जास्तीत जास्त अाराेपींना शिक्षेपर्यंत पाेहोचविण्यात मदत हाेईल. कुठलाही गुन्हा घडल्यास पोलिसांना हे किट बॅगसारखे असल्याने साेबत घेऊन जाणे शक्य असल्याने एेनवेळी साहित्याची करावी लागणारी धावाधाव शाेध टळणार अाहे. येत्या दाेन दिवसांतच हे किट वितरित केले जाणार अाहेत. - एस. जगन्नाथन, पाेलिस अायुक्त