आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकील विनाकारण दिवसभर स्थानबद्ध,पाेलिसांच्या बेकायदेशीर कारवाईचा वकिलांकडून निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नोटरी करणाऱ्या वकिलास मुंबई नाका पोलिसांनी सोमवारी (दि. २५) सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत बेकायदेशीररीत्या पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करून ठेवले. अटकपूर्व जामीन मंजूर होऊनही वकिलाला सोडल्याने वकील वर्गामध्ये संताप व्यक्त करण्यात आला. या कारवाईच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा वकील संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये एक मालमत्ता हस्तांतर वादाचा गुन्हा दाखल होता. परविन फरजीन नावाच्या एक महिलेचे मृत्युपत्र अॅड. उदय शिंदे यांनी नोटरी केले होते. या मृत्युपत्राच्या अधारे पुष्पा नवले यांच्या लाभात फरजीन यांना सर्व जमीन देण्याचे म्हटले होते. नवले यांनी देवळाली तलाठी कार्यालयात नावे लावण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, फरजीन यांचे अमेरिकेतील नातेवाईक हतोश मुकादम यांनी नावे लावण्यास हरकत घेतली होती. नवले यांच्याकडून कब्जा करताना सुरक्षारक्षकास मारहाण करण्यात आली. या सुरक्षारक्षकाच्या तक्रारीच्या अाधारे नवलेंसह त्यांच्या नातेवाइकांच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासासाठी पोलिसांनी नोटरी रजिस्टर जप्त केले होते. नोटरी अॅक्ट १३ प्रमाणे गुन्हा नोंदवणे गरजेचे असताना शिंदे यांना पोलिस बेकादेशीररीत्या घेऊन गेल्याचे अॅड. मंदार भानोसे यांनी सांगितले. अटकपूर्व जामीन मंजूर करून त्याची प्रत देऊनही पोलिसांनी अॅड. शिंदे यांना सोडले नाही, असे अॅड. भानोसे यांनी सांगितले.

बेकायदेशीर कारवाई
^मुंबईनाकापोलिस ठाण्यातील निरीक्षक पाटील यांनी सर्व नियमांचे उल्लंघन करून अॅड. शिंदे यांना स्थानबद्ध करून ठेवले. अटकपूर्व जामीन घेऊनही सोडण्यात आले नाही. ही कारवाई निषेधार्ह आहे. -अॅड. मंदार भानोसे

चौकशीसाठी ताब्यात
^अॅड.शिंदेयांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अटक केली नव्हती. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. एन. अंबिका, पोलिसउपआयुक्त

गृहमंत्र्यांना निवेदन
^या बेकायदेशीर कारवाईबाबत पोलिस आयुक्तांसह गृहमंत्र्यांना निवेदन देऊ. पोलिसांनी वकिलांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. मात्र, असहकार्य केले जात अाहे. अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष,जिल्हा बार असाेिसएशन