आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शपथपत्रासाठी स्टॅम्पची आवश्यकताच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी सेतू कार्यालयात कोणत्याही प्रकारचे स्टॅम्प लागत नाहीत. विद्यार्थी साध्या कागदावरदेखील स्वत:ची स्वाक्षरी करून शपथपत्र देऊ शकतात. याबाबत शासनाने २०१४ मध्येच अध्यादेशात सुधारणा केली आहे. असे असतानाही राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या सेतू कार्यालयांमध्ये स्टॅम्पपेपरची सक्ती केली जात असल्याचे वदिारक चित्र बघण्यास मिळत आहे.

राज्यात मुद्रांक विक्रेत्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे कमिशन मिळत असते. विक्रेत्यांना जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय व न्यायालयाच्या परिसरातच जागादेखील उपलब्ध होते.

महसुली कामासह प्रत्येक विद्यार्थ्याला उत्पन्नाचा दाखला,अधिवास दाखला (डाेमिसाईल), भारतीयत्वाचा दाखला (नॅशनॅलिटी), जातीचा दाखला, नाॅन क्रीमी लेअर अशा विविध कारणांसाठी प्रतजि्ञापत्र करावे लागते. यासाठी स्टॅम्पपेपरची कोणत्याही प्रकारची गरज नसताना यंत्रणेला हाताशी धरून २०, ५० व १०० रुपयांच्या स्टॅम्पचा आग्रह धरण्यात येताे. गरज नसतानाही नाइलाजास्तव मुद्रांक विक्रेत्यांकडे गेल्यानंतर २० व ५० रुपयांचा स्टॅम्प नसून, अतिरिक्त पैशांची मागणी करून विद्यार्थी व पालकांना नाहक भुर्दंड बसताे.

यासंदर्भात नाशिकच्या नवनिर्मिती बहुउद्देशीय संस्थेने मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मुद्रांक विकेत्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
..तर तक्रार करावी
शपथपत्रासाठी विद्यार्थी अथवा पालकांकडून स्टॅम्पची मागणी केली जात नाही. त्यांनी साध्या कागदावर स्वस्वाक्षरी केलेलेच प्रतिज्ञापत्र असते. त्यामुळे असा काही प्रकार होत असेल, तर ते चुकीचेच आहे. याबाबत आमच्या स्तरावर जनजागृती करण्यात येत असून, प्रमाणपत्रासाठी कोणी स्टॅम्पची मागणी केल्यास आमच्याकडे तक्रार करावी.
रमेश काळे, मुद्रांक जिल्हाधिकारी, नाशिक
नाहक अडवणूक
राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागात जात पडताळणीसाठी १०० रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतजि्ञापत्राची मागणी केली जाते. त्याशविाय, कोणत्याही प्रकारचे प्रकरण दाखल करून घेतले जात नाही. याप्रकारामुळे यंत्रणेला हाताशी धरून, विद्यार्थी आणि नागरिकांची चक्क लूट केली जात आहे.
अॅड. अमोल घुगे, मार्गदर्शक, नाशिक नवनिर्मिती संस्था