आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकशे नऊ वर्षांत प्रथमच महिलेला मानाची तलवार, बीडच्या मीना तुपे यांचा गाैरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकच्या पाेलिस प्रशिक्षण केंद्रात सर्वाेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरलेल्या बीडच्या पाेलिस उपनिरीक्षक मीना भिवसेन तुपे यांचा मानाची तलवार देऊन गाैरव करताना मुख्यमंत्री. - Divya Marathi
नाशिकच्या पाेलिस प्रशिक्षण केंद्रात सर्वाेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरलेल्या बीडच्या पाेलिस उपनिरीक्षक मीना भिवसेन तुपे यांचा मानाची तलवार देऊन गाैरव करताना मुख्यमंत्री.
नाशिक - अाज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बराेबरीने, खांद्याला खांदा लावून काम करत अाहेत. काही क्षेत्रांत तर महिला काकणभर सरसच कामगिरी करत अाहेत. त्याचाच प्रत्यय बीडमधील तरुण महिला पाेलिस उपनिरीक्षक मीना भिवसेन तुपे यांनी अापल्या कामगिरीतून संपूर्ण महाराष्ट्राला दिला अाहे. नाशिकमधील पाेलिस प्रशिक्षण अकादमीच्या दीक्षांत समारंभात मीना यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशिक्षणातील सर्वाेच्च मान असलेला ‘स्वाेर्ड अाॅफ अाॅनर’ (मानाची तलवार) देऊन गाैरव करण्यात अाला. विशेष म्हणजे महाराष्ट्र पाेलिस प्रबाेधिनीच्या १०९ वर्षांच्या इतिहासात महिलेने प्रथमच हा पुरस्कार पटकावला अाहे.

ब्रिटिशांच्या राजवटीत १९०७ मध्ये सुरू झालेल्या महाराष्ट्र पाेलिस प्रबाेधिनीच्या अाजवरच्या इतिहासात ११३ तुकड्यांमधून सुमारे २३ हजार उपनिरीक्षक पाेलिस दलात दाखल झाले अाहेत. यंदाच्या तुकडीत ७४९ प्रशिक्षणार्थींमध्ये ५०३ पुरुष व २४६ महिलांचा समावेश असताना मीना तुपे या सर्वाेत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरल्या अाहेत. मूळच्या बीड जिल्ह्यातील दगडीशहा, जानपूर (कामखेडा) येथील रहिवासी असलेल्या तुपे या शेतकरी कुटुंबीयांतील असून अतिशय हलाखीच्या अाणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले अाहे. अल्पभूधारक असलेल्या तुपे यांना तीन बहिणी अाणि लहान भाऊ असे कुटुंब अाहे. घरच्या परिस्थितीमुळे अाठवीत असल्यापासूनच मीना यांना शेतीत काम करावे लागले. स्वत:सह लहान भावंडांना शिकवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

वारंवार पडणारा दुष्काळामुळे शेतीत फारसे उत्पन्न येत नव्हते. त्यामुळे गरिबी वाढतच हाेती. कुटुंबीयांचा नाेकरी मिळावी म्हणून मीना यांनी डीएडला प्रवेश घेतला. मात्र, शिक्षिकेची नाेकरी मिळणे अवघड वाटत असल्याने पाेलिस भरतीकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले. डाेंगरदऱ्या अाणि शेतातच शारीरिक सराव करून कुणाचेही मार्गदर्शन न घेता २०१० मध्ये बीड जिल्ह्यात महिला पाेलिस शिपाई म्हणनू भरती झाल्या. सन २०१०-११च्या खंडाळा प्रशिक्षण केंद्रातही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींमध्ये उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून प्रथम पारिताेषिक मीना यांनी जिद्दीच्या जाेरावर पटकावले हाेते. यावरच न थांबता लगेच उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेची तयारी करून लाेकसेवा अायाेगाची २०१३ मध्ये परीक्षा दिली. याही परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी हाेत राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.
पुढे वाचा...
>तीन पदकांच्या मानकरी
> शेतीत गड्याप्रमाणे कामे केली
बातम्या आणखी आहेत...