आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांत होणार नाशिक अपडेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या नाशिकचा समृद्ध वारसा, इतिहास, भूगोल, कृषी, पर्यटन, आरोग्य, कला, शिक्षण, संस्कृती, सिंहस्थ कुंभमेळा, प्रसिद्ध व्यक्ती अशा सर्वंकष माहितीतून विकिपीडियाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर खऱ्या अर्थाने नाशिक अपडेट होईल. येत्या दोन महिन्यांत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती विकिपीडियाचे उपाध्यक्ष अभिषेक सूर्यवंशी यांनी दिली.

मायको सर्कल परिसरातील दी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स इंडिया नाशिक लोकल सेंटरच्या सभागृहात कुंभथॉन प्रकल्पांतर्गत कुंभथॉन प्रकल्प आणि विकिपीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक अपडेट हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी अभिषेक सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना माहिती संकलित करण्याबाबत मार्गदर्शन केले. विकिपीडियामध्ये माहिती टाकण्याबाबतचे काम करताना कोणती तत्त्वे आणि नियमांचे पालन करायचे याचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी विकिपीडियावर प्रत्यक्ष माहिती कुठल्या पद्धतीने टाकली जाते, याचे प्रात्यक्षिकही त्यांनी करून दाखविले. येत्या दोन महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती कुंभथॉन प्रकल्पाचे प्रमुख सुनील खांडबहाले यांनी यावेळी दिली.

या प्रकल्पाला दि इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स इंडिया लोकल सेंटर एअर टेल फोर जी यांचे सहकार्य लाभले आहे. प्रकल्पाच्या यशासाठी सहभागी विद्यार्थ्यांचे तयार केले गेले विषयवार विविध ग्रुप शहरातील विविध महाविद्यालयांतील सुमारे १५० विद्यार्थी विकिपीडियावर नाशिक शहराची अद्ययावत स्वरूपाची माहिती टाकण्याच्या या प्रकल्पात सहभागी झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करण्यात आले असून, नाशिकच्या वेगवेगळ्या विषयांवरील माहिती संकलित करणार आहेत. संकलित माहितीची सत्यता पडताळून नंतर ती अद्ययावत केली जाणार आहे.