आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After 27 Years One Rupee Notes Production Starts In Nashik

नाशिकमध्ये २७ वर्षांनंतर एक रुपयाच्या नोटेचे उत्पादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - देशात चलनात सर्वाधिक उपयोगात येणा-या एक रुपयाच्या नोटेचे करन्सी नोटप्रेसमध्ये सन १९८८ मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू हाेते. दरम्यानच्या काळात रुपयाच्या नोटेचे उत्पादन बंद करण्यात आले. दाेन महिन्यांपूर्वी अर्थमंत्रालयाने एक रुपयाच्या नोटेच्या उत्पादनाचा निर्णय घेऊन प्रेसकडे मागणी नोंदवली. २७ वर्षांनंतर संधी मिळताच करन्सीच्या कामगारांनी युद्धपातळीवर एक रुपयांच्या पाच मिलियन नोटांचे अवघ्या महिनाभराच्या आत वेळेपूर्वी नोटांचे उत्पादन पूर्ण केले.

भारत सरकारने देशातील अर्थमंत्रालय रिझर्व्ह बँकेच्या प्रत्येक प्रेसला पर्याय उभा केला. मात्र, आयएसपी प्रेसला पर्याय उभा राहू शकला नाही. कुशल मेहनती कोणत्याही स्पर्धेला सामोरे जाण्याची जिद्द बाळगणा-या कामगारांनी आपली मक्तेदारी सिद्ध करत आर्थिक वर्षात तब्बल दोनशे कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. पासपोर्ट छपाईत मोनोपॉली असलेल्या आयएसपीने वर्षात एक कोटी सहा लाख पासपोर्टचे उत्पादन केल्याने परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रेसकडे सन २०१५-१६ वर्षासाठी दीड कोटी पासपोर्ट उत्पादनाची मागणी नोंदवली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील पासपोर्टच्या धर्तीवर भारत सरकारने इ-पासपोर्ट छपाईचा निर्णय घेतला असून, आयएसपीने तयार केलेल्या आराखड्यास परराष्ट्र मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. कच्चा माल उपलब्ध झाल्यानंतर उत्पादनास सुरुवात होणार आहे. सुरुवातीला अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच इ-पासपोर्ट वितरित केला जाणार आहे.

इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये सर्व प्रकारचे स्टॅम्प, पासपोर्ट, पोस्टाचे स्टॅम्प, सरकारच्या महत्त्वाच्या दस्तऐवजाचे उत्पादन होते. प्रेसचे महामंडळात रूपांतर झाल्यानंतर प्रेसने उत्पादनात लक्षणीय वाढ केल्याने आर्थिक वर्षात देशातील नऊ प्रेसमध्ये आयएसपीने सर्वाधिक उत्पादनाबराेबरच विक्रमी दोनशे कोटी रुपये नफा कमवण्यापर्यंत मजल मारली.

करन्सीची घोडदौड
करन्सीनोट प्रेसने देशातील नऊ प्रेसमध्ये आपली आगळी-वेगळी छाप पाडली आहे. आयएसपीपाठाेपाठ सीएनपीने उत्पादन नफ्यात आघाडी घेतली आहे. सीएनपीने यापूर्वीच शंभर काेटी नफ्याच्या विक्रमाची नाेंद केली हाेती. यावर्षीही कामगारांनी दाखविलेल्या एकजुटीमुळे केलेल्या प्रयत्नामुळे उत्पादनात त्यापुढे याेग्य पद्धतीने मजल मारली आहे.

सीएनपीला सीएमडी चषक
संपूर्णदेशात असणा-या सिक्युरिटी प्रिंटिंग अॅण्ड मिटिंग काॅर्पाेरेशन इंडिया या महामंडळातील नऊ कारखान्यात बेस्ट प्राॅफिट प्राॅडक्शनचा बहुमानाचा ‘सीएमडी चषक’ करन्सी नाेट प्रेसने सलग दुस-यांदा पटकावला. याअगाेदही या कारखान्याने विविध उपक्रम याेग्य पद्धतीने राबवून देशपातळीवरील विविध बक्षिसे बिळविली आहेत.

पासपाेर्टला मागणी
पर्यटन,नाेकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त परदेशात जाणा-या भारतीयांच्या संख्येत दिवसागणिक वाढ हाेत असल्याने पासपाेर्टला देशात सर्वाधिक मागणी आहे. नाशिकमध्ये महिन्याला सुमारे सहा हजार पासपाेर्टची गरज पडत आहे. आयएसपीची पासपाेर्ट उत्पादनात मक्तेदारी असली तरी इतर उत्पादनांत माेठी आघाडी घेत प्रेसने वर्षात २३ काेटी स्टॅम्पचे उत्पादन केले आहे. याशिवाय विविध राज्यासाठी निवडणुकीच्या एव्हीएम मशीनचे सील, सरकारी दस्तएेवजांचे उत्पादन केले आहे.

आयएसपी, सीएनपी देशात अव्वल
आयएसपी,सीएनपी प्रेसने उत्पादन नफ्यात अव्वल स्थान पटकावले आहे. आयएसपीने दाेनशे काेटी रुपये नफा कमवला. सीएनपीने देशात बेस्ट प्राॅफिट प्राॅडक्शनचा सीएमडी चषक पटकावला आहे. आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्यास दाेन्ही प्रेसचा देशात काेणी हात धरू शकणार नाही. ज्ञानेश्वरजुंद्रे, कार्याध्यक्ष, आयएसपी मजदूर संघ

माेठ्या प्रमाणात राेजगार निर्मिती
आयएसपी,सीएनपीसह देशातील नऊ प्रेसचे महामंडळात रूपांतर झाल्यानंतर नाशिक युनिटच्या कामगारांनी ठरवून दिलेल्या वेळेपूर्वीच उत्पादनात सातत्य ठेवून देशात आदर्श निर्माण केला. येत्या काळात उत्पादनातील वाढीमुळे माेठ्या प्रमाणात राेजगार निर्मिती हाेणार आहे. याेग्य पद्धतीमुळे याेग्य प्रकारे उत्पादन वाढले आहे. यामुळे वाढ झाल्याने कर्मचा-यांत आनंद पसरला आहे. जगदीशगाेडसे, सरचिटणीस, आयएसपी मजदूर संघ

कामगारांना श्रेय
सन२०१४-१५ वर्षात नाशिकच्या आयएसपीकडे नाेंदवलेल्या मागणीनुसार आमच्या कामगारांनी प्रतिकूल परिस्थितीत एक काेटी सहा लाख पासपाेर्टचे उत्पादन करून या क्षेत्रातील आपली मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध केली. परराष्ट्र मंत्रालयाने सन २०१५-१६ वर्षासाठी प्रेसकडे दीड काेटी पासपाेर्टच्या उत्पादनाची मागणी नाेंदवली आहे.