आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक अनाेखा याेग: 33 वर्षांनी गणेशोत्सव, बकरी ईद अाले एकत्र; पुढील वर्षी श्रावणात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गणेश उत्सवाची धामधूम सगळीकडे सुरू झाली अाहे. शुक्रवारी गणराय विराजमानही हाेणार अाहेत. पण यंदा हिंदू धर्मियांच्या गणेशाेत्सवात बकरी ईदही अाल्याने धार्मिक एकाेप्याचे दर्शन घडणार अाहे. ३३ वर्षांना हा याेग जुळून अाला अाहे. 

कुर्बानीची ईद अर्थात ईद ऊल अझहा सप्टेंबरला साजरी होणार आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी बाजार भरला असून, ग्राहक पसंतीचे बोकड खरेदी करण्यासाठी तेथे गर्दी करीत आहेत. तसेच दुसरीकडे शुक्रवारी (दि. २५)श्री गणेश चतुर्थी असून गणेशोत्सवाच्या काळातच यंदा बकरी ईद साजरा केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी बकरी इद अाहे. पोलीस प्रशासनाकडून शांतता कमिटीच्या बैठका घेऊन हे दोन्ही सण-उत्सव शांततेत पार पाडण्याच्या सूचना केल्या जात अाहेत. तर शहरात हे दोन्ही सण एकत्र आल्याने या सणांच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश देण्यासाठी हिंदू-मुस्लिम धर्मातील युवकांकडून विविध उपक्रम करण्याचे नियोजन केले जात आहे. शहरातील भद्रकाली, पंचवटी, नाशिकरोड सातपूर भागात असलेल्या मंडळांमध्ये अनेक मुस्लिम तपदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तर बकरी ईदसाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री अनेक हिंदू बांधवांकडून हाेत असते. त्यामुळे एक सामाजिक सलाेखा या दाेन्ही उत्सवांमध्ये दिसून येताे अाहे. 

एक अनाेखा याेग 
१९८३ ला बकरी ईद आणि गणेशोत्सव हे दाेन्ही सण एकत्र आले होते. गेल्या वर्षी एका दिवसाचा फरक आला होता. यंदा मात्र, दोन्ही एकत्र आल्याने दोन्ही समाजामध्ये आनंदाचा वातावरण आहे.
- असलम खान, सामाजिक कार्यकर्ता 
 
हिंदूधर्मीयांच्या दिनदर्शिकेत दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. त्यामुळे मुस्लिमधर्मीयांचा एक महिना अगोदर येतो. त्यामुळे यंदागणेशोत्सवात बकरी ईद आहे. तर २०१८ मध्ये मात्र श्रावण महिन्यात बकरी ईद असणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...