नाशिक - अाजकालची तरुणाई सामाजिक कार्यात फारशी दिसत नसली तरी नाशिकमधील गंगाधर जाेशी यांनी सेवानिवृत्तीनंतरही अापले सामाजिक कार्य सुरू ठेवून तरुणांना अाणि समाजाला वेगळा अादर्श घालून दिला अाहे. सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी अाधाराश्रमाला अाधार दिला असून रसिक रंजन फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून अापले सामािजक कार्य जाेमाने अाणि अव्याहतपणे सुरू ठेवले अाहे.
सेवानिवृत्त झाल्यानंतर बहुतांश ज्येष्ठ नागरिक अापल्या कुटुंबातच वेळ देणे पसंत करतात. मात्र नाशिकमधील ८५ वर्षीय गंगाधर ऊर्फ अप्पा जाेशी याला अपवाद ठरतात. नाशिकमधील या रिमांड हाेमध्ये त्यांनी मुलांना ज्ञानार्जन करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान नाशिकमधील अंगणवाड्यांना त्यांनी भेटी दिल्या. यानंतर अंगणवाड्यांची दुरुवस्था लहान मुलांचे दयणीय अवस्था पाहून द्रारीद्र्य काय असते, याची प्रचिती आली. त्यानंतर हे कार्य हाती घेतल्याचे जाेशी यांनी सांगितले.
४८० मुलामुलींना अाणले शिक्षणाच्या प्रवाहात
शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांचा शाेध घेऊन जाेशी यांनी त्या मुलांना धाेंडेगाव, कश्यपी धरणाजवळील अादिवासी अाश्रमशाळेत प्रवेश मिळवून दिला अाहे. येथे इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण घेण्याची साेय अाहे, येथील अाश्रमशाळेला अनुदान मिळत नसल्याने मुलांची माेठी गैरसाेय हाेते, त्यामुळे जाेशी यांनी मुलांना झाेपण्यासाठी पंचवीस हजार रुपये किमतीच्या सतरंज्या उपलब्ध करुन दिल्या अाहेत.
दाेन मुलींचे कन्यादान : जाेशी यांनी १४ वर्षे अाधाराश्रमासाठी काम केले. यादरम्यान अनेक विवाह साेहळे पार पडले. मात्र त्यातील दाेन मुलींचे कन्यादान करण्यास काेणी पुढाकार न घेतल्याने जाेशी यांनी स्वत: कन्यादान करून त्यांनी मुलींना वडिलांच्या मायेची ऊब दिली अाहे.