आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Accident Singing Porgramme Show Must Go On

अपघातानंतरही ‘शो मस्ट गो ऑन’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - खासगी सुख-दु:ख बाजूला ठेवून ऊन, वारा, पाऊस सहन करीत कलावंतांना रसिकांची करमणूक करावी लागते. याची प्रचिती नुकतीच नाशिकच्या गायक कलावंतांना आली. गायन मैफलीसाठी नाशिकहून निघालेल्या गीता माळी आणि भूषण कापडणे यांना धुळ्याजवळ अपघात झाल्याने दुखापत झाली. परंतु, मैफल रद्द न करता त्यांनी मलमपट्टी करून गाणी सादर केली आणि ‘शो मस्ट गो ऑन’चा संदेश दिला.
धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या एका संस्थेने ‘गुलदस्ता’ ही नाशिकचे पार्श्वगायक गीता माळी व भूषण कापडणे यांची मैफल आयोजित केली होता. नाशिकहून निघालेल्या या कलावंतांच्या खासगी वाहनाला सोनगीर फाट्याजवळ समोरून येणार्‍या ट्रेलरने जोरदार धडक दिली. त्यात गीता, भूषण यांच्यासह विशाल दवंगे आणि चालक प्रशांत जाधव जखमी झाले. भूषण यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली, तर गीता यांच्या हाताला मार लागला. या अपघातानंतर मैफल रद्द होण्याची भीती संयोजकांना होती. परंतु, तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार घेऊन मलमपट्टी केलेल्या अवस्थेतच त्यांनी मैफल सादर केली.
रसिकांची उत्स्फूर्त दाद
या कलावंतांचे मलमपट्टी केलेल्या अवस्थेत व्यासपीठावर आगमन झाले आणि त्यांच्या या आस्थेवाइकपणाला उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. ओल्या जखमांच्या वेदनांना गाण्यात कोठेही स्थान न देता संबंधित कलावंतांनी त्याच ताकदीने गाणी सादर केली हे विशेष!