आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारती केल्याने बहिष्कृत आठ तरुणांची ‘घरवापसी’, माफी मागितल्याने पुन्हा इस्लाममध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव- रमजानपुरा भागात गणरायाची अारती केल्याने इस्लाममधून बहिष्कृत झालेल्या तरुणांची पुन्हा ‘घरवापसी’ झाली. अारतीसाठी उपस्थित असलेल्या अाठ जणांना मौलाना मुफ्ती वाजिद अली यांच्या नेतृत्वाखाली कलमा पठण करून इस्लामविराेधी केलेल्या कृत्याचा ताेबा करत माफी मागितली.  
 
मालेगावातील रमजानपुरा भागात जय बजरंग एकता गणेश मंडळाने परंपरेनुसार श्री गणरायाची स्थापना केली. १९८५ पासून हे मंडळ कार्यरत अाहे. मंडळात सर्वच समाजांचे तरुण सक्रिय सहभाग घेतात. संवेदनशील असणाऱ्या शहरातून एकतेचा संदेश जावा म्हणून रविवारी हिंदू व मुस्लिम बांधवांनी एकत्रित अारती केली. हा प्रकार कट्टरवाद्यांना सहन न झाल्याने या मुस्लिम तरुणांची कृती इस्लामविराेधी ठरवून त्यांना इस्लाममधून बहिष्कृत झाल्याचे फतवे जारी करण्यात अाले. वेगवेगळ्या संघटनांनी यावर तिखट प्रतिक्रिया देत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. अारतीप्रसंगी उपस्थित असणाऱ्या अाठ तरुणांना रमजानपुरा भागातील मशिदीत मंगळवारी सायंकाळी बाेलावण्यात अाले. माैलाना मुफ्ती वाजिद अली यांनी कलमा पढवून ताेबा करण्यास सांगत इस्लाममध्ये प्रवेश करून घेतला.  
   
जनजागृतीवर देणार भर
इशाच्या नमाजानंतर सुलेमानी मशिदीत मुस्लिम धर्मगुरूंची बैठक झाली. धर्मगुरूंनी असे प्रकार शहरासाठी नवीन नाही. काही वर्षांपूर्वी एका हिंदू महिलेचा मृत्यू झाला हाेता. तेव्हा मुस्लिमांनी हिंदू पद्धतीप्रमाणे तिचा अंत्यविधी केला हाेता. इतर धर्मांचा सन्मान करताना अापल्या धर्माविराेधात कृत्य हाेऊ नये याची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.

प्रकरण मिटले   
माझ्यासाेबत अारती करणाऱ्या व उपस्थित असलेल्या तरुणांनी कलमा पठण करून कृत्याची माफी मागितली अाहे. झाल्या प्रकारावर अाता पडदा पडला अाहे. केवळ धार्मिक बाब म्हणून कुणी प्रकरण वाढवू नये.   
- पीडित मुस्लिम तरुण    

खूप दु:ख झाले   
कुणाच्या धर्माचा अनादर हाेईल, हा कुठलाही हेतू नव्हता. गणेश विसर्जनासाठी ट्रॅक्टर, भंडाऱ्यात अन्नदानाचे याेगदान मुस्लिम बांधव देतात. प्रत्येकाचा देव वेगवेगळा असला तरी सृष्टीचा निर्माता हा एकच अाहे. या घटनेला धार्मिक रंग दिल्याने खूप दु:ख झाले.   
- अनिल भुसे, अध्यक्ष, बजरंग एकता मंडळ   
बातम्या आणखी आहेत...