आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानानंतरही सर्वच कांदा सडणार, भावातील घसरण सुरूच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सगळीकडे पसरलेला असह्य उग्र दर्प, घोंगावणाऱ्या माशा आणि चिखल झालेला शेकडो किलो कांदा... येवल्याच्या अशोक दराडेंच्या कांदा चाळीवरील हे भयंकर दृश्य. ‘या परिस्थितीतून निवडून चांगला कांदा काल मार्केटला पाठवला तर दीडशे रुपयेसुद्धा भाव मिळाला नाही. आता दोनशे रुपये रोजाने मजूर लावून चाळीतला हा कांदा उकिरड्यावर फेकून देतोय,’ दराडे सांगत होते. त्यांच्या चाळीतल्या ३०० क्विंटल कांद्याचा चिखल झाला आहे. सडलेल्या कांद्याची भयंकर दुर्गंधी सगळीकडे पसरली होती. त्यामुळे स्थानिक मजूरही येत नाहीत म्हणून हजार रुपयांचे गाडीभाडे देऊन दहा मजूर बाहेरून आणले. त्यांना दोन हजारांची मजुरी देऊन सडलेला कांदा चाळीतून उकरून उकिरड्यावर टाकण्याचे काम सुरू होते.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातीसाठी टक्के अनुदान जाहीर करूनही कांद्याच्या किमतीमधील घसरण सुरूच आहे. कांद्याचे बंपर पीक आल्याने घसरणाऱ्या किमती स्थिर करण्यासाठी केंद्रीय वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी २५ ऑगस्ट रोजी कांद्याच्या निर्यातीस टक्के अनुदान जाहीर केले. ‘पण याला फार उशीर झाला आहे. आपले जागतिक मार्केट केव्हाच पाकिस्तानने पळवले. ईदच्या निमित्ताने दुबई मार्केट मिळेल असे वाटले होते, पण तेही ठप्प झाले आहे. श्रीलंकेचा कांदा आल्याने त्यांनी आयात थांबवली आहे,’ असे निर्यातदार विकास सिंग यांनी सांगितले.

निर्यात अनुदान जाहीर केल्यानंतरही कांद्याच्या भावामधील घसरण सुरूच आहे. सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून लासलगाव बाजार समितीत कांद्याचे किमान भाव १०० रुपये क्विंटल म्हणजे रुपये किलो एवढे घसरले आहेत.

‘दुसरीकडे हुबळी, बेळगाव, बंगळुरूच्या लाल कांद्याचीही आवक सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिणेत मागणी नाही. उत्तरेतील राज्ये महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातचा कांदा घेतात. त्यामुळे नाशिकमधल्या सडलेल्या कांद्याला काहीच भाव नाही. उलट बाहेर गेलेला माल खराब म्हणून घाटा येतोय,’ असे कांदा व्यापारी मिथिलेश सांगत होते.

जुलै महिन्यात व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याने महिनाभर मार्केट बंद राहिल्याने शेतकऱ्यांचा कांदा चाळीत पडून राहिला. त्यानंतर आलेल्या पावसाने हवेतील आर्द्रता ८० टक्क्यांच्या वर गेली. या साऱ्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ५० टक्के कांदा सडला आहे. परिणामी चाळीत १०० क्विंटल ठेवलेल्या कांद्यातून अवघा ५० क्विंटल कांदा हाती लागतोय. त्यालाही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचे चौपट नुकसान होत आहे. ‘काय करायचे सरकारच्या रुपयाचे?’ असे जनार्दन जगताप विचारतात. गेल्या वर्षी त्यांच्या १०० क्विंटल कांद्याला ८०० रुपये दराने ८० हजार रुपये मिळाले होते. यंदा त्यापैकी ५० टक्के कांदा सडला आणि उरलेल्या ५० क्विंटलला ४०० रुपये दराने २० हजारही मिळाले नाहीत. या कांद्यासाठी त्यांना उत्पादन खर्च आला होता लाख रुपये.
‘उन्हाळ कांद्याची तिप्पट लागवड झाल्याने बंपर पीक येईल. त्याचे वेळीच नियोजन करा, या मागणीचा पत्रव्यवहार २६ ऑक्टोबरपासून पंतप्रधान, केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, कृषी मंत्रालय आणि राज्य शासन यांच्याकडे करत आलो. पण कुणीच लक्ष दिले नाही. १० ऑगस्टला गडकरींच्या कार्यालयात बैठक घेतली. तोपर्यंत महिने उलटून गेले होते. चाळीतला कांदा तब्बल ५० टक्के सडून गेला,’ असे लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पाटील सांगतात. सध्या देशात २५ लाख मेट्रिक टन कांद्याचे अतिरिक्त पीक असल्याची माहिती त्यांनी दिली.

जागेवरच पंचनामे करावेत
राज्यातील जिल्ह्यांमधील ५० बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक आहे. खराब झालेल्या कांद्याचे जागेवरच पंचनामे करा, अशी मागणी सरकारकडे करीत असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. ‘कांद्याचे जास्तीचे उत्पादन आणि पडलेल्या किमती यासाठी मे महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. मात्र, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. आता सडलेल्या कांद्याचे सरकारने जागेवरच पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई बाजार हस्तक्षेप योजनेच्या निधीतून द्यावी अशी मागणी आहे,’ असे शेट्टी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...