आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विभक्त राहत असल्याच्या तपासणीनंतरच मिळणार रेशनकार्ड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - विभक्त रेशनकार्ड देण्यापूर्वीच संबंधित अर्जदाराच्या रहिवासी ठिकाणी जाऊन तो खरंच विभक्त राहत असल्याची चौकशी केल्यानंतरच संबंधिताला रेशनकार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात मध्यस्थी करणारे दलाल आणि जिल्हा पुरवठा कार्यालय, धान्य वितरण कार्यालयातील रेशनकार्डमध्ये होणारा काळाबाजार आणि बोगस पद्धतीने देण्यात येणार्‍या कार्डवर आळा बसणार आहे.

अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येवर र्मयादा आणल्यानंतर आणि एकत्र कुटुंब असतानाही रेशनकार्ड विभक्त करत अधिक अनुदानित सिलिंडर तसेच रॉकेल मिळवित शासनाची फसवणूक करण्याचे प्रकार नागरिकांकडून सर्रास सुरू झाले. एकत्र राहत असतानाही विभक्त राहत असल्याचे सांगत रेशनकार्ड तयार केले गेले. त्यामुळे हे प्रकार घडत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यावर शासनाने पर्याय शोधत या प्रकारांना चाप लावला आहे. त्याचबरोबर रेशनकार्डसाठी नव्याने काही सूचना देण्यात आल्या असून, त्यांच्या पूर्ततेनंतरच कार्ड वितरित केले जात आहेत.

केंद्रचालकांची शिक्क्यांबाबत नाराजी : नागरिकांना दाखले त्वरित मिळावे यासाठी शासनाने सेतूसोबतच महा इ-सेवा केंद्राद्वारे दाखले वितरणाची सुविधा सुरू केली. याबाबतचे काम एका संस्थेस देण्यात आले. त्याअंतर्गत उपकेंद्र सुरू करण्यात आले. हे केंद्रचालक दररोज येणारी विविध दाखल्यांची आणि रेशनकार्डची प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाक्षरीसाठी आणतात. संबंधित अधिकार्‍यांकडून स्वाक्षरी झाल्यानंतर त्यावर शिक्का मारणे अनिवार्य असते. मात्र, त्याची जबाबदारी दिलेली संबंधित व्यक्ती क्वचितच कार्यालयात उपस्थित असते. त्यामुळे दाखले वितरित करता येत नाहीत. शिक्के मारण्यासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी बसावे लागते. त्यातून अनेकदा आम्ही दलाल असल्यासारखेच भासविले जात असल्याचे या सेतू चालकांनी सांगितले. त्यामुळे शिक्के मारणार्‍या व्यक्तीस जिल्हाधिकारी कार्यालयात एक जागा द्यावी. त्याचबरोबर दाखले स्वाक्षरीस देताना सुरक्षेच्या दृष्टीने रजिस्टरसोबतच ती स्वीकारली जातात. हे योग्य असले तरीही त्याच दिवशी दाखल्यांवर स्वाक्षरी झाली नाही तर दुसर्‍या दिवसाच्या दाखल्यांसाठी हे रजिस्टर कसे आणणार, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


शहरात अडीच लाख कार्ड
नाशिक शहरात 2 लाख 47 हजार 928 रेशनकार्ड आहेत. त्यात केसरी एक लाख 80 हजार 121, दारिद्रय़ रेषेची 55 हजार 756 , अंत्योदयची 12 हजार 51 आणि शुभ्र 39 हजार 600 कार्डधारक आहेत.


कागदपत्रे तपासून घ्यावे
बुधवारीच मी शहर आणि ग्रामीणमधील इ-सेवा केंद्रचालकांची बैठक घेतली. त्यात रेशनकार्डपासून सर्वच दाखल्यांचे अर्ज स्वीकारताना संपूर्ण कागदपत्रे तपासून घ्यावेत. त्रुटी असलेली प्रकरणे स्वीकारूच नयेत तसेच अर्ज जमा करताना त्यावर टोकननंबरसह जमा करावेत. स्वाक्षरीसाठी रजिस्टरसह अर्ज द्यावे. जेणे करून नागरिकांना त्वरित दाखले मिळतील. पंकज पवार, प्रभारी तहसीलदार, नाशिक