आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकोट हल्ल्यानंतर सुरक्षा कडक, तोफांचे छायाचित्र घेण्यास प्रसारमाध्यमांनाही बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवळालीच्या स्कूल ऑफ आर्टिलरीच्या जवानांनी तोफांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकून घेतली. (छाया: अशाेक गवळी)
नाशिक - पंजाबमधील पठाणकोट येथील अतिरेकी हल्ल्यानंतर सर्वत्र कडक सुरक्षा वाढविण्यात आली आहे. देवळाली येथे ‘सर्वत्रा प्रहार’ हे फिल्ड फायरिंग पाहण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह लष्करी जवानांचीही चौकशी करून सोडण्यात येत होते. या ठिकाणी महत्त्वपूर्ण तोफा असल्याने त्याची माहिती आणि फोटो प्रसारित करण्यास प्रसारमाध्यमांवर बंधन घालण्यात आले होते.

पठाणकोट येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडेकोट सुरक्षा वाढविण्यात आली आहे. नाशिकमध्ये देवळाली येथे स्कूल ऑफ आर्टिलरीसारखे महत्त्वपूर्ण केंद्र असल्याने येथेही लष्कराने कडक सुरक्षा ठेवली आहे. सोमवारी स्कूल ऑफ आर्टिलरीच्या वतीने शिंगवे बहुलाच्या परिसरातील लष्करी हद्दीत सर्वत्रा प्रहार हे फिल्ड फायरिंगचे प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी महत्त्वपूर्ण तोफांची प्रात्यक्षिके असल्याने कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती.
तोफांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी निवडक लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. दुसरी कोणतीही व्यक्ती येऊ नये, यासाठी लष्करी अधिकाऱ्यांचीही वाहने थांबवून त्यांची चौकशी केली जात होती. ज्या विभागातील लष्करी जवान असेल त्या विभागाच्या प्रमुखाकडे चौकशी करण्यात येत होती. त्यानंतरच प्रात्यक्षिके पाहण्यासाठी पुढे प्रवेश देण्यात येत होता. ज्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते, परंतु ते लष्करी जवानांचे नातलग होते त्यांना अर्ध्या रस्त्यातून पुन्हा परत जाण्याचे सांगण्यात आले होते.