आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेचे दुर्लक्ष, दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा, मोरवाडीकरांमध्ये संताप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको- मोरवाडीगावात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. आठवड्यापासून अशाप्रकारे पाणीपुरवठा होत असून, याबाबत महापालिकेकडे तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मोरवाडीत आठवड्यापासून पिण्याच्या पाण्यात नाल्याचे दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी येत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसून, आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही पालिका अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नळाला आलेले पाणी नागरिकांनी बादलीत भरून ठेवले आहे. अधिकाऱ्यांना ते दाखवयाचे असून, ते पाहायला आल्यास पालिकेत नेऊन टाकणार असल्याचे महिलांनी सांगितले. यावेळी लंकाबाई सानप, भागूबाई बरके, आरती चकोर, भाग्यश्री धात्रक, रत्ना बरके, बबाबाई बरके, दुर्गा पगारे, गीताबाई आव्हाड, सरला घुगे, कमलाबाई पगारे, मीना देवरे, अनुसया जाधव, सविता तडाखे आदींसह महिला उपस्थित होत्या.
लहान मुले आजारी
- असे पाणी येत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. लहान मुले आजारी पडत आहेत. याबाबत तत्काळ दखल घेतल्यास आम्ही मनपासमोर आंदोलन करू.
बबाबाई बरके, नागरिक
पालिकेला गांभीर्य नाही
- नागरिकांच्या प्रश्नाबाबत महापालिकेला गांभीर्य नाही. वारंवार तक्रारी करूनही लक्ष दिले जात नाही. दुर्गंधीयुक्त पाणी हे पिण्या योग्य नाही. याबाबत तत्काळ दखल घ्यावी.
-भागूबाई बरके, नागरिक
बातम्या आणखी आहेत...