आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकेश्वरनंतर कपालेश्वर गर्भगृह प्रवेशाच्या वादाला प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - त्र्यंबकेश्वरमधील मंदिराच्या गर्भगृहात प्रदीर्घ लढ्यानंतर महिलांना गर्भगृह प्रवेशाचा मार्ग नुकताच खुला झालेला असताना, अाता काही महिला संघटनांनी नाशकातील कपालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशाबाबत केलेल्या मागणीनंतर झालेल्या बैठकीत वादावादी झाल्याने अाता या मुद्द्याला धुमारे फुटण्याची चिन्हे दिसू लागली अाहेत.

त्र्यंबकराजाच्या मंदिराप्रमाणेच नाशकातील कपालेश्वर मंदिरालाही शेकडाे वर्षांची परंपरा अाहे. त्यामुळे मंदिरातील प्रवेश, पूजापाठ, गाभारा प्रवेश याबाबतच्या पूर्वापार परंपरा अद्यापही कायम अाहेत. त्या पार्श्वभूमीवर काही महिला संघटनांनी या मंदिराच्या गाभाऱ्यातही महिलांना प्रवेश मिळावा, अशी मागणी केली हाेती. त्यामुळे मंदिराच्या पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या तहसीलदार राजश्री अहिरराव-गांगुर्डे यांच्यासह विश्वस्त, पुजारी अाणि गुरवांची मंगळवारी (िद. ३) बैठक झाली. या बैठकीत महिलांच्या गर्भगृह प्रवेशाचा मुद्दा उपस्थित झाल्यावर बहुतांश विश्वस्तांनी त्याबाबत सकारात्मकता दाखवली. मात्र, पुजारी अाणि गुरवांनी या निर्णयाला विराेध करीत मंदिराची परंपरा कायम राखण्याचा अाग्रह धरला. दरम्यान, बैठकीमध्ये मंदिरात ठेवण्यात अालेल्या दाेन दानपेट्यांच्या वादाचीही भर पडली. मात्र, त्यावर वादावादी हाेण्यास प्रारंभ झाल्याने तहसीलदार मॅडमनी यासंदर्भात पुन्हा एक बैठक घेण्याचा निर्णय घेऊन ही बैठक अाटाेपती घेतली. परंतु, त्र्यंबकराजाच्या मंदिरातील गर्भगृह प्रवेशाच्या मुद्द्याप्रमाणे कपालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांच्या प्रवेशाचा वादही नजीकच्या काळात चर्चेत राहण्याची चिन्हे मंगळवारच्या बैठकीतून स्पष्ट हाेऊ लागली अाहे.
बातम्या आणखी आहेत...