आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफजलच्या फाशीने समाधान, भाजप-शिवसेनेचा आनंदोत्सव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - संसदेवरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अफजल गुरूला फाशीची शिक्षा दिल्यामुळे नाशिकमधील सर्व पोलिस ठाण्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. शहरात शिवसेना व भाजपने फाशी दिल्याबद्दल जल्लोष साजरा केला. या निकालाच्या अमलबजावणीबद्दल सर्व स्तरात समाधान व्यक्त करण्यात आले.

काही वर्षांपासून दहशतवादी कारवाईच्या दृष्टीने नाशिक शहर संवेदनशील बनले आहे. दहशतवादी बिलालचे येथील वास्तव्य उघड झाल्यानंतर धोक्याची तीव्रता वाढल्याचे संकेत मिळाले होते. या पार्श्वभूमीवर अफजल गुरूला फाशी झाल्यानंतर नाशिक पोलिसांना हाय अलर्टचे आदेश देण्यात आले. अफजल गुरूला फाशी दिल्याबद्दल जुन्या नाशिकमध्ये फटाके फोडून व पेढे वाटप करून जल्लोष करण्यात आले. नाशिक, नाशिकरोड, सिडकोतील विजयनगर येथे शिवसैनिकांनी जल्लोष केला. सिडकोत र्शीकांत सोनवणे, सोमानाथ तडाखे, सतिश गामणे, गोविंद घुगे, गणेश सोनवणे आदींसह शिवसैनिक या वेळी उपस्थित होते.

राजकीय व्यवस्था गतिमान होतेय : विधिज्ञ
कसाब असो किंवा अफजल या दोघांनाही न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर झटपट दयेच्या अर्जावर निकाल अपेक्षित होता; त्यावेळी निर्णय झाला नाही. मात्र, गेल्या काही महिन्यात राजकीय व्यवस्थेने धाडसी निर्णय घेणे सुरू केल्याने न्याय व्यवस्थेचे कामकाज गतिमान होईल. अँड. नागनाथ गोरवाडकर

कसाब व अफजल गुरूला फाशीची शिक्षा न्यायालयाने आधीच सुनावली. त्याबाबत जागरूक होऊन निर्णय घेतल्याने राजकीय व्यवस्थेचे महत्त्वही वाढणार आहे. अँड. अजय मिसर, सरकारी वकील

अफजलला दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी उशिराने का होईना सरकारने केल्याने सकारात्मक बदल होतील. राजकीय व्यवस्था गतीमान झाल्याचे हे चिन्ह आहे. अँड. अविनाश भिडे

राजकारणी म्हणतात, देर आए. दुरुस्त आए
संसद भवनावर भ्याड हल्ला करणार्‍या अफजल गुरूवर कॉँग्रेस सरकारने कारवाई करून दहशतवाद्यांना धडा शिकवला. फाशीमुळे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना खरी र्शद्धांजली मिळाली. आकाश छाजेड, शहराध्यक्ष, कॉँग्रेस

अफजलला गुरूला देण्यात आलेली फाशी म्हणजे कॉँग्रेस सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. वसंत गिते, आमदार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

अजमल कसाबपाठोपाठ अफजल गुरूला विलंबाने का होईना फाशी दिल्यामुळे देशविरोधी कारवाया करणार्‍यांना चोख प्रतिउत्तर मिळाले आहे. शरद कोशिरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी