आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Again Chilly In City, Temperature 8.7 Degree Celsius

शहरात पुन्हा थंडी, तपमान ८.५ अंशांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उत्तर भारत आणि राजस्थानमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढल्याने पश्चिम भारतातील तपमानात घसरण झाली आहे. त्यामुळे पुन्हा वातावरणात गारवा जाणवू लागला अाहे. रविवारी नाशिक शहरात किमान ८.५, तर कमाल ३१.५ अंश सेल्सिअस अशी तपमानाची नाेंद झाली. त्यामुळे रविवारी सकाळी अचानक थंडीत वाढ झाली हाेती.
डिसेंबर महिन्यात घसरलेल्या तपमानानंतर तीन दिवसांपूर्वी कमाल किमान तपमानात वाढ झाली होती. परंतु, जम्मू-काश्मीरच्या लेहमध्ये उणे ९.०, गुलमर्ग येथे उणे ५.९ अंश सेल्सिअस, तर राजस्थानच्या सिकर येथे उणे ५.८ अंश सेल्सिअस अशी तपमानाची नाेंद झाली अाहे. यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे वेगाने येत आहे. रविवारी सकाळी ६५ टक्के आर्द्रता होती, तर सायंकाळी २८ टक्के आर्द्रता होती.