आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन थंडीत अंडी-चिकन स्वस्त, नोटाबंदी निर्णयाबरोबरच भाजीपाला स्वस्त झाल्याचा परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दरवर्षी हिवाळ्यात अंडी चिकनचे दर घसरत असताना यंदा मात्र नोटाबंदीच्या निर्णयाने मोठे व्यवहार ठप्प झाल्याने, तसेच भाजीपालाही स्वस्त झाल्याने अंड्यांच्या दरात घसरण झाली आहे, तर दमणप्रमाणे बर्ड फ्ल्यूची साथ नाशिकमध्ये नसूनही चिकनही काही प्रमाणात स्वस्त झाले अाहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहेे. हुडहुडी भरविणाऱ्या थंडीमध्ये खवय्ये नॉनव्हेज खाण्याला अधिक पसंती देतात. याचमुळे मागणी वाढत असल्याने अंडी, चिकनच्या दरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होते. 
 
अंड्यांची प्रचंड मागणी लक्षात घेता शहरात हैदराबाद, कर्नाटकबरोबरच सातारा, सांगली येथूनही आवक होते. मात्र, यंदा नोटाबंदीच्या निर्णयाचा या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. चलनाची चणचण जाणवत असल्याने या व्यवसायातील मोठे व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळेच भाजीपालाही स्वस्त झाल्याने अंड्यांचीही मागणी काहीशी कमी झाली आहे. याचमुळे एरवी थंडीमध्ये ७२ रुपये डझनपर्यंत पाेहाेचणारे अंड्यांचे दर सद्यस्थितीत ५४ रुपयांवर अाले अाहेत. डझनामागे साधारण २० रुपयांची घसरण झाली आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास या किमतीमध्ये अाणखी घसरण हाेऊन विक्रेत्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यात बर्ड फ्लूू नाही 
जिल्ह्यामध्ये बर्डफ्लूसारखी कोणतीही परिस्थिती नाही. उपाययोजना म्हणून विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ५५० पोल्ट्रीफार्मचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. या अहवालात कोणत्याही प्रकारची बर्ड फ्लूची लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही - डॉ. प्रशांत फालक, जिल्हापशुसंवर्धन अधिकारी.
 
नाेटबंदीसह चर्चेचाही परिणाम 
नाेटबंदीपूर्वी चिकनचाभाव १८० रुपये किलाेपर्यंत हाेता, ताे नाेटबंदीनंतर १४० रुपयांपर्यंत अाला अाहे. सध्या १३० रुपयांनी अाम्ही चिकन विक्री करताे अाहाेत. बर्ड फ्लूचा परिणाम नसला तरी १०-१५ टक्के विक्री कमी झाली अाहे - माेईन काझी, संचालक, काझी चिकन.
 
भाजीपाला स्वस्त झाल्याचाही परिणाम 
भाजीपाला महाग असल्यास ग्राहक अंडी खरेदीला प्राधान्य देतात. मात्र, सद्यस्थितीत भाजीपालाही स्वस्त असल्याने अंडी किंमतीवर परिणाम झाला आहे. -दादा माळी, प्रगती पोल्ट्री.
 
नाेटाबंदीच्या निर्णयामुळे... 
नोटाबंदीच्या निर्णयाचा व्यवसायावर परिणाम झाला आहे. थंडीच्या काळात अंडी दरात गेल्यावर्षी बरीच घसरण झाली आहे. -पवन तांबोळी, पवन एग्ज सेंटर.
 
अंडे साडेचारला एक 
थंडीच्याकाळात गेल्या वर्षी साधारणत: रुपये प्रतिनग दराने अंडी व्रिकी होत होती. मात्र, यंदा याच मोसमात ४.५० रुपये प्रतिनग प्रमाणे ५४ रुपये डझन दराने ती विकली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.