आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रस्तावित वीज दरवाढीविराेधात अाज वीजबिलांची हाेळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वीजगळती,निकृष्ट ग्राहकसेवा, महागडी वीज खरेदी अशा चुका सुधारताही राज्य वीज नियामक अायाेगाकडे चार वर्षांसाठी माेठी वीजदरवाढ मागितल्याचा निषेध म्हणून साेमवारी (दि. ४) नाशिकराेडच्या विद्युत भवन येथे वीजबिलांची हाेळी केली जाणार अाहे. शहरातील अाैद्याेगिक व्यापारी संघटना यात माेठ्या प्रमाणावर सहभागी हाेणार अाहेत.

महावितरणने येत्या चार वर्षांमध्ये जवळपास ५६ हजार काेटींच्या वीजदरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक अायाेगासमाेर ठेवला अाहे. यामुळे दरवर्षी १९ ते २० टक्के दरवाढीची झळ वीजग्राहकांना बसणार अाहे. मुळात वारंवार सांगूनही महावितरणने स्वस्त दरातील वीज खरेदी केली जात नाही, शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे अाॅडिट हाेत नाही, व्यावसायिक व्यवस्थापन हाेत नाही, ते केले जावे, अशी मागणी वीजग्राहक समितीकडून केली जात अाहे.

या दरवाढीच्या प्रस्तावावर येत्या २५ जुलै राेजी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवन येथे सकाळी १०.३० पासून सुनावणी हाेत अाहे. या सुनावणीकरिता हजाराे हरकती दाखल हाेणार अाहेत. वेगवेगळ्या प्रकारे निषेधही नाेंदविला जात असून, अाजची वीजबिलांची हाेळी हे त्याचेच प्रतीक अाहे. या अांदाेलनात वीजग्राहक समिती, नाशिक िजल्हा ग्राहक पंचायतीसह निमा, अायमा, चेंबर अाॅफ काॅमर्स, शेतकरी संघटना, शिवसेना अादी सहभागी हाेणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...