आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाऊसिंग लेखापरीक्षण मुदतवाढीसाठी अांदाेलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सहकार विभागाने नाशिक तालुक्यातील लेखापरीक्षण केलेल्या ३६५९ हाऊसिंग साेसायट्या बरखास्त करण्यापूर्वी सहकार विभागाने नाेटीस दिल्याच्या निषेधार्थ हाऊसिंग साेसायटी बचाव समितीच्या वतीने साेमवारी (दि. ११)जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अांदाेलन करण्यात अाले.
सहकार अायुक्त अाणि निबंधक सहकारी संस्थेने सहकारी संस्थांचे सर्वेक्षण करण्यासाठी विशेेष माेहीम राबविण्याचा निर्णय घेतल्यानुसार ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत सहकारी हाऊसिंग साेसायट्यांना अवसायनात काढण्याची मुदत हाेती. याबाबत हाऊसिंग साेसायटी बचाव समितीने ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ मिळण्याची मागणी केली हाेती. मात्र, सहकार विभागाच्या वतीने जिल्हा उपनिबंधकांना पाठविलेल्या पत्रात हाऊसिंग साेसायट्या पहिल्या निर्णयाप्रमाणे अवसायनात काढण्याचे अादेश दिल्याने नाशिक तालुक्यातील चार हजार ७७१ पैकी तीन हजार ६५९ संस्थांची नाेंदणी रद्द करण्यात अाली अाहे. याविराेधात हाऊसिंग साेसायटी बचाव समितीने काॅ. राजू देसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपनिबंधक कार्यालयात अांदाेलन करण्यात अाले. लेखापरीक्षणास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात अाली. शहरातील लक्षावधी नागरिकांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा असलेल्या या विषयावर सहानुभूतीने निर्णय घेण्याचे निवेदनात नमूद करण्यात अाले अाहे.यावेळी पद्माकर इंगळे, संजय श्रीश्रीमाळ, राहुल जैन, वंदन साेनवणे अादी उपस्थित हाेते.

माेहीम याेग्यच, पण मुदतवाढ हवी...
नाशिकसह महाराष्ट्रातील९१ हजार हाऊसिंग साेसायट्यांपैकी बहुसंख्य साेसायट्यांचे अस्तित्व धाेक्यात येत अाहे. सर्वेक्षण करण्याची माेहीम याेग्य असली तरी गृहनिर्माण संस्थांकडे पाहण्याचा दृष्टिकाेन बदलला पाहिजे. साेसायट्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक राहतात, याची दखल घेऊन लेखापरीक्षणासाठी मुदतवाढ दिली पाहिजे. सुभाष देसले, अायटक नेते