आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डास निर्मूलनासाठी मच्छरदाणी आंदोलन, ठेकेदाराला काम सुधारण्याचे अादेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अागरटाकळी मलनिस्सारण केंद्रात माेठ्या प्रमाणात मैला साचल्याने दुर्गंधी पसरली अाहे. शिवाय संपूर्ण नाशिकराेड, गांधीनगर अाणि उपनगर परिसरात डासांचा प्रचंड उपद्रव झाला असल्याचे सांगत भाजपचे नगरसेवक प्रा. कुणाल वाघ यांनी सभागृहात मच्छरदाणी अाणत प्रशासनाच्या कामकाजाचा निषेध केला. संबंधित ठेकेदाराला जबर दंड करून कामकाज सुधारण्याचे अादेश दिल्याचे सांगत येत्या काही दिवसात दुर्गंधी बंद हाेण्याची ग्वाही या वेळी अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी दिली.

महापाैरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत प्रा. कुणाल वाघ यांनी पत्र देत डासांचा प्रादुर्भाव शहरात वाढल्याचे निदर्शनास अाणून दिले. अागरटाकळी मलनिस्सारण केंद्रामुळे दुर्गंधी वाढली अाहे. डासांची उत्पत्ती वाढल्यामुळे परीक्षा काळात विद्यार्थ्यांचेही प्रचंड हाल झालेत. त्यामुळे डास निर्मूलनाची कार्यवाही संशाेधनात्मक दृष्टीने करावी अशीही मागणी त्यांनी केली. एसटीपीचे दुर्गंधीयुक्त पाणी थेट नदीपात्रात साेडले जात असल्याने पाणवेली वाढली अाहे. त्यासंदर्भात अाराेग्याधिकाऱ्यांनी कबुली दिली अाहे. त्यामुळे डास कमी करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अन्यथा डास मारण्याच्या रॅकेटस अाणून महापालिकेत अांदाेलन छेडण्याचा इशारा प्रा. कुणशल वाघ यांनी केला. या वेळी उद्धव निमसे यांनी नांदूर मानूर, दसक, पंचक या परिसरातही डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे सांगत डासांची अंडी नष्ट करण्यासाठी प्रयत्नच हाेत नसल्याचा आरोप केला.

ठेकेदारालाकेला अायुक्तांनी दंड : डासांच्याअळ्या मारणे हाच डास निर्मूलनाचा प्रभावी उपाय असल्याचे सांगत अायुक्त डाॅ. गेडाम म्हणाले की, अागरटाकळी येथील एसटीपीची पाहणी मी केली अाहे. तेथील स्थिती बघून संबंधित ठेकेदाराला माेठा दंड केला अाहे. परंतु त्याचा ठेका मध्येच निलंबित करता येणार नाही. दुसऱ्या ठेकेदारालाही हे काम प्रभावीपणे करणे जमल्यास कायदेशीर प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. मलनिस्सारण केंद्रातून पाणी नदीपात्रात साेडले जाते असे सांगितले जात असले तरीही अाम्ही शासकीय प्रयाेगशाळेत पाण्याच्या बीअाेडीचे नमुने तपासले अाहेत. त्यात बीअाेडी २० टक्क्यांपर्यंत अाल्याचे निदर्शनास अाले. तितक्या बीअाेडीला शासनाने मान्यता दिली अाहे. पण तरीही अाम्ही डास निर्मूलनासाठी युद्धपातळीवर उपाययाेजना करीत अाहाेत. या संदर्भात जलसंपदा विभागाला पत्र देऊन नदीतील कालव्यांना छिद्रे पाडण्याची परवानगी मागितली अाहे. पात्रात साचलेले पाणी निघून गेल्यावर हे बांध पूर्वी प्रमाणेच बांधून देण्यात येतील, असेही अायुक्त म्हणाले.

मैदानांसाठी समिती
मैदानांबाबत धाेरण ठरविण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात अाला. स्वतंत्र समिती गठित करून तिने महासभेत अहवाल सादर करण्याचा अादेश महापाैरांनी दिला

वाघांच्या मच्छरदाणीची चव्हाणांकडून चिरफाड
प्रा. वाघ यांच्या मच्छरदाणी अांदाेलनाची चिरफाड करण्याचे काम शिक्षण मंडळ सभापती संजय चव्हाण यांनी महासभेतच केले. प्रा. वाघ यांनी स्थायी समितीला दिलेल्या पत्राचे वाचन करण्याची सूचना करीत त्यात अाैषध फवारणी ठेक्याची फेरनिविदा काढण्याची सूचना प्रा. वाघ यांनीच केल्याचे चव्हाण यांनी निदर्शनास अाणून दिले. ही सूचना दिली नसती तर डास निर्मूलनाचे काम चार महिने अाधीच झाले असते, असेही चव्हाण म्हणाले.

अाैषध फवारणी वाढवणार
नाशिक शहरातील सर्वच भागात डास निर्मूलनासाठी अाैषध फवारणी माेठ्या प्रमाणात करण्यात यावी. उघडे ढापे बंद करण्यात यावेत. तसेच डासांची उत्पत्ती हाेणार नाही यासाठी सतर्कतेने लक्ष देण्याची सूचना मी प्रशासनाला देत अाहे. या विषयात खाते प्रमुखांनी अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे अाहे. - अशाेक मुर्तडक, महापाैर

डास निर्मूलनासाठी या उपाययाेजना
- अाैषध फवारणी ठेकेदाराचे कर्मचारी प्रत्येक घरी सात दिवसातून एकदा जातात का, याची हाेणार तपासणी.
- पाण्यातील अळ्या मारण्यासाठी हाेणार तपासणी.
- पानवेली काढण्यासाठी तातडीच्या उपाययाेजना करणार.
- नदीपात्रातील फेस काढण्यासाठी निरीकडून मागविला पर्याय.
- क्लाेरीनच्या प्रमाणात करण्यात अाली वाढ.

महापालिकेच्या शनिवारी भरलेल्या महासभेत नगरसेवक प्रा. कुणाल वाघ यांनी उपनगर परिसरातील डासांच्या उपद्रवप्रश्नी मच्छरदाणी अाणत प्रशासनाच्या कामकाजाचा निषेध केला.