आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मालेगाव - मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर ‘फेसबुक’वर प्रसारित करणा-यांना अटक करावी, या मागणीसाठी जनता दलाच्या वतीने शुक्रवारी निषेध रॅली काढण्यात आली तसेच सुलेमानी चौकात तासभर रास्ता रोकोही करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली. दरम्यान, या प्रकारामुळे बंदोबस्त वाढवण्यात आला असून पोलिस अधीक्षक स्वत: तळ ठोकून बसले होते.
काही दिवसांपासून फेसबुकवर मुस्लिम समाज व पवित्र धर्मस्थळांबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला जात आहे. त्याबाबत समाजातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी संशयित जावेद अख्तर याच्याविरुद्ध गुन्हादेखील दाखल करण्यात आला. शुक्रवारी माजी मंत्री निहाल अहमद यांचे पुत्र तथा जनता दलाचे शहराध्यक्ष बुलंद एकबाल यांच्या नेतृत्वाखाली जवळपास पाचशे कार्यकर्त्यांची मोटारसायकल निषेध रॅली काढण्यात आली. फेसबुकवर अवमानकारक मजकूर प्रसारित करणा-यांना तत्काळ अटक करा, अशी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांच्या वतीने जिल्हा पोलिस प्रमुख प्रवीणकुमार पडवळ यांना निवेदन देण्यात आले.
काँग्रेसी दगाबाज
राज्य व केंद्रातील सत्ताधारी कॉँग्रेस सरकार दगाबाज आहे. देशभरातील मुस्लिम बांधवांबद्दल असलेला कॉँग्रेसचा पुळका खोटा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर प्रसारित करणा-या महिलांवर तत्काळ कारवाई झाली होती. मग मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणा-यांचा शोध का लागत नाही? हा दुजाभाव आहे, असा आरोप बुलंद एकबाल यांनी केला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.