आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरच येतील... अच्‍छे दिन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - केंद्रात सत्तारूढ झालेल्या नरेंद्र मोदी सरकारकडून व्यवसाय क्षेत्राला अनेक अपेक्षा असून, त्यात एकत्रित करप्रणालीपासून नाशिकच्या मातीत पिकणार्‍या द्राक्ष, कांदा, डाळिंब, टोमॅटो यांवर प्रक्रिया आणि साठवणुकीकरिता कृषिपूरक उद्योगही आले पाहिजेत, त्यासाठी शीतगृहांच्या साखळीसह कृषिपूरक सेवा उभारणी हवी. नाशिकच्या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय निर्यातही सुरू झाली पाहिजे.

खुली अर्थव्यवस्था स्वीकारणार्‍या आपल्या देशाने बाजार समितीसारखे जाचक अडथळे दूर करून ‘ओपन मार्केट’प्रणाली राबविली तर शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावण्याबरोबरच जिल्हावासीयांचाही फायदा होईल. खर्‍या अर्थाने ज्यांना नव्याने व्यवसाय-उद्योग उभारणीसाठी तरुणांना प्रवृत्त करण्याची गरज आहे, यासाठी केंद्र शासनाच्या योजना आणि अनुदाने या घटकांसाठी मोठय़ा प्रमाणावर आणल्या गेल्या पाहिजे. इतकेच नाही तर यासाठी टॅक्स हॉलीडे जाहीर केल्यास उद्योग उभारणीकडे तरुण वळतील. सोने आयातीवरील अबकारी कर पूर्वीप्रमाणेच दोन टक्के केला गेला पाहिजे, फूड अँण्ड सेफ्टीसारखे कायदे जे केंद्र सरकार बनविते; पण राज्य सरकारकडून राबविले जातात त्यात अनेक त्रुटी असून, त्याचा फटका व्यावसायिकांना बसतो, ते दूर करण्याची आणि असे इतर कायदे सुधारण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे

आर्थिक, भौगोलिक, सामाजिक प्रगती, सर्वंकष विकास या मुद्यांवर प्रचाराचा रोख ठेवणारे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत लोकांनी भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत दिले. साहजिकच, नव्या सरकारकडून प्रत्येक समाजघटकाला मोठय़ा अपेक्षा आहेत. वेगाने वाढीच्या बाबतीत तर आपले नाशिक जगात सोळाव्या स्थानावर आहे. त्या अनुषंगाने येथील विविध क्षेत्रांसाठी नव्या सरकारने काय पावले उचलावीत, त्याचा धांडोळा..