आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षांचा मुलगा ठार; नाशिक जिल्‍ह्यातील थरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विक्‍की शांताराम पिठे - Divya Marathi
विक्‍की शांताराम पिठे


लासलगाव - शेतातून गायीला परत आणण्यासाठी गेलेल्या चापडगाव (ता. निफाड) येथील एका दहा वर्षांच्या मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याने तो ठार झाला. विक्‍की शांताराम पिठे असे मृताचे नाव आहे.
बहिणीने केली मदतीसाठी धावाधाव
विक्‍की हा शनिवारी दुपारी त्याच्या बहिणीसोबत शेतात चरायला गेलेल्या गायीला आणण्यासाठी गेला होता. बिबट्याने विकीवर हल्ला करताच त्याच्या बहिणीने मदतीसाठी गावाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बिबट्या विकीला उसाच्या शेतात घेऊन गेला होता. बऱ्याच शोधानंतर विकी गंभीर अवस्थेत सापडला. निफाड येथे प्रथमोपचारानंतर त्याला तातडीने नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. निफाड परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार असून, अनेक लहान बालके हल्ल्यात ठार झाली आहेत. त्यामुळे वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वर्षभरातील तिसरा मृत्‍यू
वर्षभरात बिबट्याच्‍या हल्‍ल्‍यात आतापर्यंत परिसरातील तिघांचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावले आहे. तर विक्कीच्या कुटूबियांना आर्थिक मदत करण्याची घोषणा वनविभागाने केली आहे.